Next
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा
प्रेस रिलीज
Wednesday, January 09, 2019 | 02:49 PM
15 0 0
Share this story

पुणे : नवीन वर्षाचे औचित्य साधून पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडतर्फे नुकतीच चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एक हजारांहून अधिक मुले सहभागी झाली होती.

पाच ते सात वर्षे, आठ ते दहा वर्षे आणि ११ ते १५ वर्षे या वयोगटांत ही स्पर्धा झाली. प्रत्येक गटांतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आला. विजेत्यांना बक्षिसे व सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आली. ही स्पर्धा पुणे, सोलापूर व नाशिक झोनमधील एकूण २८ दालनांच्या माध्यमातून झाली. चित्र रंगविणे, सामाजिक जाहिरात, निसर्ग चित्र, मला आवडणारं फूल, सहकार्य आदी विषय झोननुसार देण्यात आले होते. परीक्षकांनी चित्रे पाहून उल्लेखनीय ठरलेल्या चित्रांची निवड स्पर्धेचे विजेते म्हणून केली.

या स्पर्धेविषयी बोलताना पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे सीईओ अमित मोडक म्हणाले, ‘दागिने बनविणे ही प्रथम कला आहे आणि त्यानंतर व्यवसाय आहे, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स मानतात. त्यामुळेच लहान मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात कलेची आवड निर्माण होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही चित्रकला स्पर्धा घेत आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link