Next
‘‘राइट टू डिस्कनेक्ट’मधून सर्वांना ‘क्वालिटी लाइफ’ मिळेल’
‘भाडिपा’च्या लोकमंचावर सुप्रिया सुळेंबरोबर रंगल्या गप्पा
प्रेस रिलीज
Tuesday, April 16, 2019 | 05:34 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘हल्लीच्या मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उदास भाव असतो. आपल्या पिढीचे कोणत्या ना कोणत्या गॅझेटसोबत किंवा स्मार्टफोनसोबत अतूट नाते निर्माण झाले आहे. आपण या गॅझेटपासून डिस्कनेक्ट व्हायलाच तयार नाही. यामुळे मानसिकदृष्ट्या एक प्रकारचे डिप्रेशन सगळ्यांनाच जाणवत आहे. ब्रेनड्रेनदेखील या सगळ्या घडामोडींत सातत्याने होत आहे. याच महत्त्वाच्या मुद्द्यासाठी ‘राइट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक आणल्याचे सांगत, या विधेयकाच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक ‘क्वालिटी लाइफ’ मिळावे हा त्यामागचा विचार आहे,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

राजकारण व समाजकारणाविषयीचा नेमका दृष्टीकोन मांडतानाच आपल्या आवडी-निवडी व अनेक व्यक्तिगत प्रश्नांची दिलखुलास उत्तरे सुप्रिया सुळे यांनी ‘भाडिपा’च्या ‘लोकमंच’ या मंचवर दिली. ‘भाडिपा’च्या ‘विषय खोल’ या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिनेता पुष्करराज चिरपुटकर याने हा संवाद साधला.

उद्याचा समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी उच्चशिक्षित, तसेच अधिकाधिक महिलांनी राजकारणात सहभागी होण्याची आवश्यकता बोलून दाखवतानच खासदार सुळे यांनी स्थानिक पातळीवर राबविलेल्या अनेक उपक्रम व कामाचा आढावा या वेळी घेतला. विकासाचे मुद्दे हे नेहमीच माझ्या अजेंड्यावर राहिले आहेत. याच प्रश्नांना घेऊन मी नेहमी जनतेसमोर गेली असून, बदल घडविण्यासाठी आजच्या युवा पिढीने राजकारणात सक्रीय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search