Next
‘एमसीई’च्या महाविद्यालयांतर्फे रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर
प्रेस रिलीज
Friday, December 29 | 05:15 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे (आझम कॅम्पस) संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांचा ७३वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला.

एमसीई सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे फूलगाव येथील (ता. हवेली) कै. वेदप्रकाश लच्छीराम गोयल मतिमंद स्कूलमध्ये धान्य वाटप करण्यात आले. या वेळी ‘एमसीई’चे सचिव लतिफ मगदूम, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरण भिसे, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १५०किलो गहू, १०० किलो तांदूळ, खाद्यतेल, बिस्किट, चहा, पापड, पोहे, लोणचे देण्यात आले. या शाळेत एकूण ३२ विशेष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे ब्राम्हणघर (ता. भोर) येथे मोफत औषधे व चष्मे वाटप करण्यात आले. एच. व्ही. देसाई हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रूग्णांची नेत्र तपासणी केली; तसेच ‘वेलनेस फॉरएवर लाईफस्टाईल केमिस्ट’ आणि सुपरमार्केट यांच्यातर्फे मधुमेह, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली. एकूण १०० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये ग्रामस्थ, शेतकरी, मजूर, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. १० रूग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ६० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भोर जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, ‘एमसीई’ सचिव मगदूम, सहसचिव प्रा. इरफान शेख, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे (डिप्लोमा) प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप, ब्राम्हणघर ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप धुमाळ, भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार, भाजप युवा मोर्च्याचे भोरचे अध्यक्ष अमर बुदगुडे, सामाजिक कार्यकर्ते उद्धव गोळे, यांसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

‘एमसीई’चे एम. ए. रंगूनवाला महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. महाविद्यलयाच्या ३१ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. महाविद्यलयाचे रजिस्ट्रार आर. ए. शेख आणि रेणुका नागराळे यांनी या रक्तदान शिबिराचे संयोजन केले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link