Next
‘रसिक’तर्फे गीतकार शैलेंद्र यांच्या आठवणींना उजाळा
प्रेस रिलीज
Thursday, November 23, 2017 | 02:32 PM
15 0 0
Share this article:

व्याख्यानमालेत बोलताना विजय पाडळकर.पुणे : जुन्या पिढीच्या हिंदी चित्रपटगीतांच्या रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘तू प्यार का सागर है’सारख्या भावनाप्रधान गीतांपासून कामगारांच्या मोर्चाला प्रेरणा देणाऱ्या ‘हर जोर-जुल्म की टक्कर मे’सारखे संघर्षगीत लिहिणाऱ्या गीतकार शैलेंद्र यांच्या स्मृतींना २२ नोव्हेंबरला  उजाळा मिळाला. निमित्त होते ते रसिक मित्रमंडळातर्फे आयोजित व्याख्यानमालेचे.

रसिक मित्रमंडळाच्या ‘एक कवी-एक भाषा’ या मासिक व्याख्यानमालेत प्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांच्यावर विजय पाडळकर यांच्या दृक-श्राव्य व्याख्यानाचे आयोजन पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘रसिक’चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी स्वागत केले. अध्यक्षस्थानी मधू पोतदार होते. या व्याख्यानमालेचे हे ५२ वे पुष्प होते.

या वेळी उपस्थित रसिक श्रोते.२८ संगीतकारांच्या १७५ चित्रपटांसाठी ७७५ गीते  लिहिणाऱ्या गीतकार शैलेंद्र यांची जीवनगाथाच रसिकांसमोर उलगडली. विजय पाडळकर यांनी शैलेंद्र यांच्या कार्यकर्तृत्व, शैलीचा अभ्यासपूर्ण परिचय करून दिला. ते म्हणाले, ‘शैलेंद्र हे एकमेवाद्वितीय गीतकार होते. गुलझार, नक्श लायलपुरी, जावेद अख्तर यांनीही शैलेंद्र यांची थोरवी सांगितली, यातच शैलेंद्र यांचे मोठेपण उठून दिसते. देशभक्तीपर गीतांसाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. मथुरेवरून मुंबईला आल्यावर त्यांची कारकीर्द बहरली. पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या शैलेंद्र यांनी कामगारांच्या लढ्यातही भाग घेतला. ‘न्योता और चुनौती’सारखे पुस्तक अण्णाभाऊ साठे यांना अर्पण केले. इप्टा, रायटर्स असोसिएशन यांसारख्या संघटनांचे प्रतिनिधीत्व केले.’

‘मंझिल वही है प्यार की’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘तू प्यार सागर है’, ‘जीना इसिका नाम है’, ‘ओ सजना, बरखा बहार आयी’, ‘आज फीर जीने की तमन्ना है’ अशा शैलेंद्र गीतांचे दृक-श्राव्य प्रसारण या कार्यक्रमात करण्यात आले. उपस्थितांनी या गीतांना दाद दिली.

‘राज कपूर यांच्या ‘बरसात’, ‘आवारा’, ‘अनाडी’, ‘जागते रहो’ या चित्रपटात लिहिलेल्या गीतांनी रसिकांना वेड लावले. ‘मधुमती’, ‘परख’, ‘गाईड’मधून शब्दांचे गारुड कायम राहिले. शैलेंद्र यांच्या १० गीतांमध्ये रिमझिम हा शब्द आणि पावसाचे वर्णन आहे. रसिकांच्या मनावर शैलेंद्रसाठी जे सिंहासन आहे, त्याची जागा कोणी घेऊ शकला नाही,’ असे सांगून पाडळकर यांनी समारोप केला.

या वेळी प्रदीप निफाडकर, मंदा कुलकर्णी, रमेश गोविंद वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search