Next
बालगोपाळांनी केले श्री गणेशाचे स्वागत!
BOI
Monday, September 10, 2018 | 04:34 PM
15 0 0
Share this article:

आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरात विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून साकारलेले बालगणेश व विविध फळे.

रत्नागिरी :
दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरात सोमवारी (१० सप्टेंबर २०१८) बालगोपाळांनी लाडक्या गणेशाचे उत्साहात स्वागत केले. त्याच्या आगमनामुळे बालदोस्तांनी जल्लोष केला. गणेशाची आगमन मिरवणूक शाळेच्या आवारात काढण्यात आली. लेझीम खेळत, ताशा- झांज वाजवत छोट्या मुले मिरवणुकीत सहभागी झाली होती. मिरवणूक वर्गात येण्यापूर्वी ओवाळणी करण्यात आली.
त्यानंतर, सुरेख सजावट केलेल्या एका वर्गामध्ये या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीसाठी विशेष आरास, आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. विविध प्रकारची फळे, फुले, पेढे, मोदक आणि खोबऱ्याचे मोदकही बाप्पासाठी नैवेद्य म्हणून ठेवण्यात आले. सर्व मुलांनी आरत्याही म्हटल्या. तालासुरात म्हटलेल्या आरत्यांना सुरेख झांजांची साथ मिळाली.

मुख्याध्यापिका मीना रिसबूड व सहकारी शिक्षिका.


दर वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त छोट्या व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून बालगणेश, विविध फळे, फुले साकारली आहेत. याचे प्रदर्शनही शाळेत भरवण्यात आले आहे. शाळेमध्ये रेखाटलेल्या सुरेख रांगोळीने मन प्रसन्न झाले.  गणेशोत्सव कसा साजरा करतात, याचे संस्कार लहान मुलांवर होण्यासाठी दर वर्षी हा उत्सव शाळेत साजरा केला जातो. मुख्याध्यापिका मीना रिसबूड यांच्यासह ज्येष्ठ शिक्षिका दर्शना जोशी, प्रज्ञा काळे, एकता कांबळे, अनघा भेलेकर, समीक्षा केतकर, श्रुती लिंगायत, सानिका तुपे, नीलम डांगे, तसेच सर्व वर्गांमधील ताई यांनी उत्सवाचे नियोजन केले. दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, तसेच शाळेचे व्यवस्थापक राजीव गोगटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील. अभ्यंकर बाकलमंदिरातील गणेशोत्सवाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search