Next
अमेरिकेतलं बाळंतपण
BOI
Monday, November 05, 2018 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

सध्याच्या युगात जग लहान झालंय. विविध क्षेत्रांतील मोठमोठ्या कंपन्यांच्या नोकरीसाठी बहुसंख्य लोक परदेशी प्रयाण करत आहेत. कालांतराने ते कुटुंबासहित तिकडेच राहतात. पुढे परदेशस्थ झालेल्या लेकी-सुनांच्या बाळंतपणासाठी आईलाही तिकडे जावे लागते. या अशा सगळ्या थोड्या किचकट, पण सुखावणाऱ्या अनुभवातून ‘माधुरी गुर्जर’ यांना जावे लागले आणि यातूनच ‘अमेरिकेतलं बाळंतपण’ या त्यांच्या पुस्तकाने जन्म घेतला. ई-बुक स्वरूपात उपलब्ध असलेल्या या पुस्तकाचा हा परिचय...
..............
परदेशगमन ही आता फार नावीन्यपूर्ण गोष्ट राहिली नसली, तरी जेव्हा एखाद्या भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीय स्त्रीला परदेशात बाळंत होण्याची वेळ येते, तेव्हा तिला आणि तिचे बाळंतपण करणाऱ्या अशा दोघींनाही अक्षरशः पदर खोचून कामाला लागायची वेळ येते. परंतु व्यवस्थित पूर्वनियोजन करून या बाळंतपणाला सामोरे गेले, तर अगदी पारंपरिक पद्धतीनेही बाळंतपण करायची इच्छा असेल, तरीही ते अवघड नाही. 

याची सुरुवात होते ती  विमान प्रवासापासून. तरुण पिढीला विमानप्रवास ही आता नवीन गोष्ट राहिली नसली, तरी यातील कित्येक मध्यमवयीन आई-बाबा हे पहिल्यांदाच परदेशी विमानप्रवास करणारे असतात. इथपासूनच्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या पुस्तकात त्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. अगदी पासपोर्ट, व्हिसा, सोबत न्यायचे सामान इथपासून ते परदेशातील (अमेरिकेतील) डोहाळजेवणे, दवाखान्यांची सिस्टिम, पद्धती, नियम आणि त्याहीपुढे बाळाच्या आंघोळीपर्यंत सर्व बाबी लक्षात घेऊन सर्व मुद्दे पुस्तकात इत्थंभूत मांडले आहेत. 

हे सर्व मुद्दे मांडत असताना त्यांच्या जोडीला मध्येच काही उल्लेखनीय अनुभव, काही खुसखुशीत विनोदी किस्से लेखिकेने आपल्या नर्मविनोदी शैलीत दिले आहेत. थोडक्यात सांगायचे झाले, तर हे पुस्तक म्हणजे, आपल्या लेकी-सुनांच्या बाळंतपणासाठी परदेशी जाणाऱ्या मैत्रिणींशी हितगूज करणारे पुस्तक आहे, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. यात बाळंतपणात त्या स्त्री ची काळजी घेण्याच्या दृष्टीने जसे मार्गदर्शन केले आहे. तसेच तान्ह्या बाळाच्या आणि त्याच्या आईच्या पौष्टिक आहाराविषयीही उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

पुण्याच्या ख्यातनाम डॉक्टर लिली जोशी यांची सुरेख अशी प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकात पारंपरिक बाळंतपणाच्या पद्धती, आयुर्वेदिक उपाय, वनौषधी, त्यांचे गुणधर्म, पारंपरिक पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज या सगळ्यांचीही माहिती देण्यात आली आहे.     

ई-बुक : अमेरिकेतलं बाळंतपण
लेखक : माधुरी अशोक गुर्जर
प्रकाशन : माधुरी गुर्जर पब्लिकेशन्स
पृष्ठे : १०४
मूल्य : १०० रुपये

(हे  ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search