Next
आला आषाढ-श्रावण
BOI
Friday, August 04 | 05:00 PM
15 0 0
Share this story

काळ्या डांबरी रस्त्याचा, झाला निर्मळ निवांत...

पूर्वपरंपरेशी नातं सांगणारे नवकवी अशी बाळकृष्ण सीताराम तथा बा. सी. मर्ढेकर यांची ओळख आहे. गोड हिवाळ्याचं वर्णन करणाऱ्या त्यांच्या कवितेइतकीच आषाढ-श्रावणाचं वर्णन करणारी त्यांची कविताही सुंदर आहे. ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कवितामध्ये आज तीच कविता पाहू या...
...........
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी;
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link