Next
‘बोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र महाराष्ट्रात यशस्वी’
दुष्काळी भागात वापर केला जाणार; वापराचे तंत्रज्ञान नानाजी देशमुख प्रतिष्ठानकडे
BOI
Tuesday, June 25, 2019 | 04:24 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘बोअरवेल खणण्यासाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी झाले आहे. या उपक्रमामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी एक चांगला उपाय सापडला आहे,’ असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव व नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे यांनी मुंबईत सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनामुळे हाती हा उपक्रम हाती घेतला होता, असेही त्यांनी नमूद केले.  

संजय पांडे म्हणाले, ‘बोअरवेल खणण्यासाठी अचूक स्थान सापडणे हे मोठे आव्हान असते. पारंपरिक पद्धतीने खणण्यात येणाऱ्या बोअरवेलला पाणी लागतेच असे नाही. पाणी लागले तरी ते पुरेसे असेलच असेही नाही. अशा प्रकारे अंदाजे बोअरवेल खणल्यानंतर पाणी लागले नाही तर मोठे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर बोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानाचे महाराष्ट्रासाठीचे अधिकार नानाजी देशमुख प्रतिष्ठानकडे आहेत. प्रतिष्ठान या तंत्रज्ञानाचा वापर करून बोअरवेल खणून काम पूर्ण झाल्यावर ते ग्रामसमितीकडे अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविणार आहे.’‘बोअरवेलसाठीचे स्थान अचूक शोधण्यासाठीच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम गेल्या वर्षी लातूर जिल्ह्यात केला. लातूर शहराजवळ बोअरवेल खणण्यात आली. त्याला चांगल्या प्रमाणात पाणी मिळत आहे. गेले वर्षभर या बोअरवेलमधून मिळणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करण्यात आले व त्याआधारे हा प्रयोग यशस्वी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्या आधारे वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यात खुबगाव या गावामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नुकतीच बोअरवेल खणण्यात आली व चांगले पाणी लागले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात तीन, तर बीड जिल्ह्यात तीन बोअरवेल खणण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणच्या अनुभवांची माहिती एकत्र करून राज्यात व्यापक प्रमाणात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल,’ असे पांडे यांनी सांगितले.

‘राज्यातील दुष्काळी स्थितीवर मात करून लोकांना पाण्याचा नियमित पुरवठा करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे टंचाईच्या भागात बोअरवेलसाठीचे अचूक स्थान शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पाहिला. हा प्रयत्न यशस्वी झाला आहे,’ असे पांडे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sumukh About 53 Days ago
हे फार आधी करायला हवे होते , पण यातही एक खोट आहे जाहिरात बाजी करून आणि पक्षाच्या जाहिराती करून असले प्रकार नकोत .
0
0
Suraj Rathod About 82 Days ago
Find a Forming purpose Boirwell
0
0
Excellent idea will be helpful to drought affected areas About 83 Days ago
Excellent idea it will be helpful to the drought affected areas
0
0
BDGramopadhye About 83 Days ago
I should take out a patent , and then market it . It will have the whole world as assured market . Best wishes .
0
0
चिंतामणी सु सप्रे About 83 Days ago
खरचं चांगला उपक्रम आहे ... महाराष्ट्रातील सर्वच गरीब शेतकरी व सर्वसामान्य माणसाना याचा उपयोग व्हावा ....
0
0

Select Language
Share Link
 
Search