Next
‘हायर’चे कन्व्हर्टिबल बॉटम माउंटेड रेफ्रिजरेटर्स
प्रेस रिलीज
Wednesday, March 21, 2018 | 04:15 PM
15 0 0
Share this story

पुणे :  ‘हायर’ या गृहोपयोगी उपकरणे आणि ग्राहकाभिमुख इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व सलग नऊ वर्षे मोठ्या उपकरणांच्या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या ब्रँडने  नवीन कन्व्हर्टिबल बीएमआर - बॉटम माउंटेड रेफ्रिजरेटर्स भारतात दाखल केले आहेत.  हे रेफ्रिजरेटर्स दोनशे ५६ ते दोनशे ७६  लीटर क्षमतेचे आहेत.
 
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या या सर्व रेफ्रिजरेटर्समध्ये एट इन वन कन्व्हर्टिबल पर्याय देण्यात आले असून ते विविध वैशिष्ट्यपूर्ण फीचर्सनी युक्त आहेत. हल्ली प्रत्येक घराच्या गरजा वेगवेगळ्या असतात. या विशिष्ट गरजा आणि त्याप्रमाणे वैविध्यपूर्ण वापर नजरेपुढे ठेवूनच हे रेफ्रिजरेटर्स तयार करण्यात आले आहेत. यातील फ्रीजरचे रुपांतर फ्रीजमध्ये करता येत असून आठ कन्व्हर्टिबल पर्यायांच्या सहाय्याने पन्नास मिनिटांच्या अंतराने पुन्हा फ्रीजरमध्ये त्याचे रुपांतर करता येते.
 
हायरनेच प्रथम २००६ मध्ये  सादर केलेले बीएमआर तंत्रज्ञान हे या प्रकारच्या रेफ्रीजरेटर्सचे वैशिष्ट्य आहे. या तंत्रज्ञानांतर्गत, रेफ्रीजरेटर वरच्या बाजूला आणि फ्रीजर खालच्या बाजूला बसवण्यात आला असून यामुळे आपले वाकणे नव्वद टक्क्यांनी कमी होते. तसेच, फ्रीजरच्या तुलनेत फ्रीजचाच वापर अधिक केला जात असल्याने,  फ्रीजचा वापर करणे वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर होते.
 
या सादरीकरणाबाबत बोलताना हायर अप्लायन्सेस (इंडिया) लिमिटेडचे अध्यक्ष एरिक ब्रगेन्झा म्हणाले, ‘बॉटम माउंटेड रेफ्रिजरेटर्सची संकल्पना भारतात रुजवताना, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सातत्यपूर्ण संशोधन करणे आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादने पुरवणे हे हायर कंपनीचे उद्दिष्ट राहिले आहे. फ्रिजचा भाग वापरताना वापरकर्त्या ग्राहकाला किमान वाकावे लागावे, यासाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे. ग्राहकांच्या बहुमोल व वैविध्यपूर्ण गरजा भागवणारे रेफ्रीजरेटर हे स्वतःच एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन असून मूलतः ग्राहकांचे आयुष्य सोपे करण्यासाठीच हे उत्पादन आम्ही तयार केले आहे.
 
या रेंजमधील प्रीमियम मॉडेल्स काही अतिरिक्त फीचर्ससह सादर करण्यात आली आहेत. यात रेफ्रिजरेटरची कुलिंग क्षमता स्वयंचलित रितीने नियंत्रित करणाऱ्या ट्विन इन्व्हर्टर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या तंत्रज्ञानामुळे विद्युत भारातील चढ-उतारांशी सामना करणेही सोपे जात असून कमाल ऊर्जेचा वापर करता येतो. कॉम्प्रेसरवर अतिरिक्त भार आल्यानंतरही या तंत्रज्ञानातल्या नॉइज रिडक्शन फीचरमुळे फ्रीजचा आवाज कमी होतो. या अत्याधुनिक रेफ्रिजरेटर्स सिरीजमध्ये टर्बो तंत्रज्ञानासारखी खास फीचर्सही देण्यात आली असून यामुळे केवळ एकोणपन्नास  मिनिटांमध्ये बर्फ तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण होते. हे फ्रीज विविध आकर्षक रंग व पॅटर्नमध्ये उपलब्ध असून कॉम्प्रेसर व फॅनची दहा वर्षांची वॉरंटीही देण्यात येत आहे. विविध रंग व व्हॅरीयण्टमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध होणाऱ्या हायरच्या या रेफ्रीजरेटर्सची किंमत ३१ हजार ५०  रुपयांपासून ४० हजार १५० रुपयांपर्यंत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link