Next
अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन
प्रेस रिलीज
Thursday, July 19, 2018 | 05:56 PM
15 0 0
Share this article:

सुहास जोशी
मुंबई : अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, स्टार प्रवाहच्या ‘ललित २०५’ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

स्टार प्रवाहची प्रत्येक मालिका काही ना काही वेगळेपण घेऊन येते. ‘ललित २०५’ ही मालिका एकत्र कुटुंबावर आधारित आहे. सध्याच्या काळात असे एकत्र कुटुंब अभावानेच पाहायला मिळते. आजीचा सहवास तर विरळच होत चाललाय. ‘ललित २०५’ मधून नात्यांमधला हरवलेला संवाद नव्याने शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुहास जोशी या मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसतील. 

सहा ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search