Next
पुण्याचे युवा आर्किटेक्ट साकारणार स्वीडिश अॅव्हेन्यू
प्रेस रिलीज
Tuesday, June 12, 2018 | 06:17 PM
15 0 0
Share this story

स्वीडिश अॅव्हेन्यूच्या डिझाईनसाठी घेण्यात आलेल्या अर्बन डिझाईन स्पर्धेतील विजेते पार्थ मतकरी व कौशल तातिया यांना स्वीडनच्या राजदूत उलरिका सँडबर्ग यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

पुणे :  पिंपरी चिंचवडमधील स्वीडिश अॅव्हेन्यूच्या डिझाईनसाठी घेण्यात आलेल्या अर्बन डिझाईन स्पर्धेत विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या ‘पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (पीव्हीपीसीओए) या संस्थेचे पार्थ मतकरी व कौशल तातिया हे विद्यार्थी विजेते ठरले. शिक्षण,आरोग्य आणि विरंगुळा यांपासून प्रेरित असलेला ‘ग्रीन गंगा’ हा त्यांचा प्रकल्प या स्पर्धेत निवडला गेला. 

स्वीडनच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वीडनच्या राजदूत उलरिका सँडबर्ग यांच्या हस्ते या विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना स्वीडनला विनामूल्य दौरा करण्याची संधी मिळणार आहे.  

या वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ईई बीआरटी श्रीकांत सावने, अॅटलास कॉप्को इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष जीओवान्नी वालेंट, सँडविक आशिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक एरवीन स्टाइनहाउसर, अल्फा लावल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे हेड ऑपरेशन मट्टीआस अँडरसन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) चे संचालक प्रद्युम्न व्यास, ऍमेथिस्ट एंजल्स पुणेचे संचालक आणि वास्तुरचनाकार मंगेश भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते.   

या विजेत्यांनी तयार केलेली मॉडेल्स पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सादर करण्यात येणार आहेत. गेल्या पाच दशकांपासून, पुण्यात पिंपरी चिंचवडमधील स्वेयनगर भागात स्वीडिश कंपन्यांचे जागतिक दर्जाचे उत्पादन प्रकल्प स्थित आहेत. या परिसरातील स्वीडिश अॅव्हेन्यू रस्त्याचे स्वीडिश स्ट्रीटच्या मॉडेलनुसार रुपांतर करण्यासाठी पुण्यातील आर्किटेक्चरच्या महाविद्यालयांमध्ये अर्बन डिझाईन स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. 

नवीन ‘स्वीडिश अॅव्हेन्यू’ मूल्ये, नावीन्यपूर्णता, शाश्वततेसाठी पुनर्वापर आणि तंत्रज्ञान (पर्यावरणपूरक) यांचे प्रतीक असणार आहे. या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा असलेल्या परंतु, भारतीय पार्श्वभूमी कायम राखून स्वीडिश अॅव्हेन्यूचे स्मार्ट स्ट्रीटमध्ये रूपांतरीत करण्याचा स्वीडिश कम्युनिटीचा संकल्प आहे.

या वेळी स्वीडनच्या मुंबई येथील कॉन्सुल जनरल उलरिका सँडबर्ग म्हणाल्या, ‘जगासमोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत शहरे आणि पायाभूत सुविधा या महत्त्वाच्या आहेत. याशिवाय हवामान बदल, विकासाला चालना, शाश्वत विकास उद्दिष्टे यासाठी देखील हे महत्त्वाचे आहे. स्वीडिश अॅव्हेन्यूचे स्वेयनगर म्हणून नामकरण करणे आणि स्मार्ट स्ट्रीटमध्ये याचे रूपांतर करणे हे मागील पन्नास वर्षात स्वीडिश कंपन्यांनी पुण्यासाठी दिलेल्या योगदानाचे प्रतीक आहे. स्मार्ट स्ट्रीट्सच्या या भागातील तंत्रज्ञान आणि उपाय शहरी डिझाईन, ऊर्जा, वाहतूक, सर्क्युलर इकॉनॉमी आणि आयसीटी या तीन प्रमुख प्राधान्यक्रमांनी दर्शवून स्वीडिश अॅव्हेन्यूने स्वीडिश उद्योगांसाठी संधी निर्माण केली आहे. या भागातील तंत्रज्ञानाच्या कार्यन्वयनाचे उद्देश कार्यक्षमता वाढविणे,ऊर्जेचा कमी वापर, कचर्या्तून ऊर्जा निर्मिती आणि वायूंचे उत्सर्जन कमी करणे हे आहे. आकर्षक आणि उत्साहवर्धक वातावरण देऊ करत ही स्ट्रीट शाश्वत आणि सोयीस्कर राहील याची खात्री देणे हे आमच्यासाठी प्राधान्याने महत्त्वाचे आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link