Next
‘गारवे ह्युंडाई’मध्ये ‘फ्री कार केअर क्लिनिक’चे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, November 23, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडतर्फे १८ वा वार्षिक मेगा सर्व्हिस कँपचे आयोजन करण्यात आले होते. २०१८ मधील जेडीपी सीएसआय अभ्यासामध्ये ह्युंडाईला प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवून दिल्याबद्दल सर्व ग्राहकांना धन्यवाद देण्यासाठी हा कँप घेण्यात आला.

‘गारवे ह्युंडाई’तर्फे वाकड आणि वारजे या ठिकाणी घेण्यात आलेल्या कँपला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर २१ ते २७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ‘फ्री कार केअर क्लिनिक’ (एफसीसीसी) कँप गारवे ह्युंडाईच्या वाकड, वाडगाव आणि नारायणगाव या शाखांमध्ये आयोजित केले आहेत. या कँपचा फायदा सर्व ह्युंडाई ग्राहकांना घेता येणार आहे.

‘एफसीसीसी’ कँपचे उद्घाटन वाकड शाखेत गारवे ह्युंडाई व वाहतूक शाखेचे अधिकारी विनायक गारवे आणि वाडगाव शाखेत मी. युनिव्हर्स कांस्य पदक विजेते अजित थोपटे यांच्या हस्ते केले जाणार आहे. ‘एफसीसीसी’ कँपमध्ये इंजिन, ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल सिस्टम, अंडर बॉडी, एसी, इंटेरीअर, एक्सटेरीअर आदींची तपासणी करून दिली जाणार आहे.
 


या कॅंपचे आयोजन सर्व ह्युंडाई परिवारातील सदस्य ग्राहकांसाठी केले असून, या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन विनायक गारवे यांनी केले.

‘एफसीसीसी’ कँपमध्ये ग्राहकांना स्पेयर पार्ट्स, श्रम शुल्क आणि इतर मूल्यवर्धित सेवांवर, इक्सटेंडेड वारंटी आणि रोड साइड सहाय्य कार्यक्रमांवर, तसेच तीन वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांसाठी अतिरिक्त आकर्षक सवलत या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search