Next
‘बुलडाणा अर्बन’ची ‘आयसीआयसीआय’ सोबत भागीदारी
प्रेस रिलीज
Friday, May 11 | 12:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी (आयसीआयसीआय एचएफसी) या आयसीआयसीआय बँकेच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (बुलडाणा अर्बन) या शतकभर जुन्या सहकारी पतसंस्थेशी भागीदारी केल्याची घोषणा नुकतीच केली आहे. या सहयोगांतर्गत, ‘आयसीआयसीआय एचएफसी’ महाराष्ट्र, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश येथील ४०० शाखांद्वारे ‘बुलडाणा अर्बन’च्या लाखो ग्राहकांना गृहकर्जे व मालमत्तेवर कर्जे देणार आहे. येत्या चार वर्षांत, कर्जांचे प्रमाण तीस हजार कोटींपर्यंत वाढवण्याच्या ‘आयसीआयसीआय एचएफसी’च्या विस्तार योजनेचाही हा एक भाग आहे.

या भागीदारीविषयी बोलताना ‘आयसीआयसीआय एचएफसी’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध कामानी म्हणाले, ‘आयसीआयसीआय एचएफसी गृहकर्जांतील प्रवर्तक असून, विविध श्रेणींतील ग्राहकांना निरनिराळी उत्पादने उपलब्ध करते. ‘बुलडाणा अर्बन’च्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण मॉर्गेज सेवा, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा, गृहकर्जाचे आकर्षक दर व झटपट वितरण सेवा देण्यासाठी ‘बुलडाणा अर्बन’शी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ‘बुलडाणा अर्बन’च्या नव्या व जुन्या ग्राहकांना त्यांचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने यामुळे मोठी मदत होणार आहे. वित्तीय संस्थांबरोबर सहयोग करून देशबर आमचा मॉर्गेज व्यवसाय वाढवण्यासाठी ही भागीदारी पोषक ठरणार आहे. अशा प्रकारच्या भागीदारींमुळे, २०२२पर्यंत सर्वांना घरे देण्याचे सरकारचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण योगदान देऊ शकतो, असा विश्वास आहे.’

हा सहयोग ‘बुलडाणा अर्बन’च्या ग्राहकांना अधिकाधिक सोय देण्याच्या दृष्टीने आधुनिक डिजिटल गृहकर्ज सेवा व कर्जाच्या अर्ज प्रक्रियेत कमीत कमी पेपरवर्क व कर्ज वितरणाच्या वेगामध्ये लक्षणीय सुधारणा उपलब्ध करणार आहेत.

‘आयसीआयसीआय एचएफसी’विषयी :
आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी प्रामुख्याने गृह व अन्य क्षेत्रांमध्ये कर्जे वितरित करते. ‘आयसीआयसीआय एचएफसी’ घरामध्ये सुधारणा, ऑफिससाठी जागा, मालमत्ता सेवा, तसेच ईएमआय अंडर कन्स्ट्रक्शन अशी विविध कर्ज उत्पादने उपलब्ध करते. घरांशी संबंधित कर्जांबरोबरच, ‘आयसीआयसीआय एचएफसी’ सिक्युरिटीजवरही कर्ज देते व कन्झ्युमर ड्युरेबल लोनही देते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link