Next
‘बीएनसीए’मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद व कार्यशाळा
प्रेस रिलीज
Saturday, June 23, 2018 | 04:36 PM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोपुणे : इंडो-जर्मन स्मार्ट इनिशिएटिव्ह (आयजेएसआय) आणि महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनमधील (बीएनसीए) पर्यावरण विभागातर्फे ‘जर्मनी आणि भारत यांचा स्मार्ट शहरांविषयीचा दृष्टिकोन’ यावर एक विशेष आंतरराष्ट्रीय परिषद व कार्यशाळा होणार आहे. ही परिषद ‘बीएनसीए’च्या सभागृहात २७ ते २९ जून या कालावधीत होणार आहे. २७ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता परिषदेला सुरुवात होईल.

‘लवकरच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणार्‍या ‘बीएनसीए’मधील या परिषदेत जर्मनीतील बर्लिन युनिव्हर्सिटीतील नामवंत तज्ज्ञ प्राध्यापक, तसेच स्मार्ट सिटी पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आणि अन्य पुणेकर अभ्यासक सहभागी होत आहेत,’ असे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी सांगितले.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘नजिकच्या भविष्यात भारतातील नियोजित स्मार्ट शहरांसाठी आवश्यक असणार्‍या बांधकाम, शहर नियोजन आराखडा, वाहतुकीचे चलन-वलन, पाणी, वीज आणि सर्व प्रकारचे नियोजन यावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आपले विचार मांडतील. या परिषदेच्या निमित्ताने जर्मनी व भारतातील विविध प्रकल्प आणि त्यांचे दृश्य स्वरूप यावर विस्तृत विचारमंथन होईल. पर्यावरणीय वास्तूरचनाशास्त्र हा विषय ‘बीएनसीए’मध्ये स्वतंत्रपणे शिकवला जात असून, २००६पासून त्याचा पदव्यूत्तर अभ्यासक्रमातही समावेश करताना हा विभाग या विषयाचे मुख्य केंद्र बनवण्यात आले आहे.’

‘दोन वर्षांच्या या स्वतंत्र अभ्यासक्रमातून संशोधन व नियोजन, पर्यावरणाचा व्यापक दृष्टिकोन याबरोबरच संवेदनशील पर्यावरणीय आराखडा व तसे प्रस्ताव तयार करण्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते. यानिमित्ताने ‘बीएनसीए’मधील अर्बन लॅब फोरतर्फे स्मार्ट शहरांमधील जागांचा स्मार्ट वापर कसा करायचा यावरही विचार मांडला जाईल. आतापर्यंत अशा प्रकारची तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद व कार्यशाळा बर्लीन, दिल्ली व कोईम्बतूर पाठोपाठ आता ‘बीएनसीए’मध्ये पुण्यात भरत आहे. या कार्यशाळेत स्मार्ट शहरांचे नियोजन आणि एकात्म तसेच सर्वसमावेशक नियोजन पद्धतींची माहिती दिली जाणार आहे,’ असे डॉ. कश्यप यांनी सांगितले.

परिषदेविषयी :
कालावधी :
२७ ते २९ जून २०१८
वेळ : सकाळी ९.३० वाजता
स्थळ : डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनचे (बीएनसीए) सभागृह, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link