Next
‘एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स’ला ४०६ कोटी नफा
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 11:27 AM
15 0 0
Share this story

मुंबई : एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स लि.ने (एलटीएफएच) आर्थिक वर्ष २०१८ मधील चौथ्या तिमाहीत चारशे सहा कोटींचा एकत्रित करोत्तर नफा मिळवला आहे. आर्थिक वर्ष २०१७ मधील चौथ्या तिमाहीतील तीनशे १६ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात २८ टक्के वार्षिक वाढ  झाली आहे. कंपनीने  आर्थिक वर्ष २०१८ मध्ये एक हजार ४५९ कोटी रुपये एकत्रित करोत्तर नफा मिळवला आहे. आर्थिक वर्ष २०१७ मधील 1042 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ४० टक्के वाढ झाली आहे.  

रुरल फायनान्स, हाउसिंग फायनान्स व होलसेल फायनान्स या व्यवसायात, कंपनीने  चांगली वाढ नोंदवली. सर्व उत्पादनांची स्पर्धाक्षमता वाढवणे, जोखीम व्यवस्थापन उपायांसह, वैविध्य दर्शवण्यासाठी डिजिटल व डेटा अॅनालिटिक्सच्या वापरामुळे ही वाढ साधणे शक्य झाले. कंपनीच्या गुंतवणूक व संपत्ती व्यवस्थापन व्यवसायातही उत्तम वाढ झाली. यामुळे नफ्यात चांगली वाढ झाली असल्याचे कंपनीने नमूद  केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link