Next
सुशांतचा दमदार अभिनय असलेला ‘सोनचिडिया’
तत्त्ववादी दरोडेखोरांची कहानी
BOI
Friday, March 01, 2019 | 03:53 PM
15 0 0
Share this story


मुंबई : दिग्दर्शक अभिषेक चोबे पुन्हा एकदा प्रेक्षकांना दरोडेखोरांच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक मार्चला प्रदर्शित झालेला त्यांचा ‘सोनचिडिया’ हा चित्रपट धमाल करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सुशांत सिंग राजपूत, मनोज वाजपेयी, रणवीर शौरी आणि आशुतोष राणा यांनी साकारलेले दरोडेखोर प्रेक्षकांना किती भावतील हे पाहणे उत्सुकतेचे असेल. 

‘चंबळ’च्या खोऱ्यात राहणारे हे दरोडेखोर आहेत, जे लोकांची लूटमार करून आपली गुजराण करतात. असे असले, तरी चित्रपटातील अनेक प्रसंगांवरून हे दरोडेखोर तत्त्ववादी असल्याचेही समोर येते. वाईट कृत्य करत असले, तरी त्यांनी स्वतःसाठी ठरवून घेतलेली काही तत्त्वे मात्र ते शेवटपर्यंत पाळतात असे दाखवण्यात आले आहे. 

चित्रपटात तीन मुख्य दरोडेखोर दाखवण्यात आले आहेत. मान सिंह (मनोज वाजपेयी), वकील (रणवीर शौरी) आणि लखना (सुशांत सिंग राजपूत). आशुतोष राणा हे एका शक्तीमान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी, दरोडेखोरांचा म्होरक्या मान सिंगला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटातील दरोडेखोरांच्या भूमिकेत असलेल्या या तीन अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्री भूमी पेडणेकरनेदेखील उत्कृष्ट भूमिका केली आहे. 

सुशांत सिंग राजपूतया दरोडेखोरांच्या ग्रूपचा म्होरक्या मान सिंग म्हणजेच मनोज वाजपेयी हे दरोडेखोर असूनही अतिशय हळूवार मनाचे असल्याचे दाखवले आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे सहकारीही देवभोळे आणि संवेदनशील दाखवण्यात आले आहेत. एक नव्या धाटणीचा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिल्यास तो नक्कीच आवडेल असाच आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link