Next
कासेगावात सौर पंपाने शेतीला पाणी
BOI
Monday, February 12 | 03:49 PM
15 0 0
Share this story

कासेगाव (पंढरपूर) : येथील रवींद्र आर्वे आणि बंधूंनी शेतात सुरू केलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपाची पाहणी करताना शेतकरी.सोलापूर : विजेअभावी शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी आता सौरऊर्जा वापरण्याबाबत सजग होऊ लागले आहेत. जिल्ह्यात प्रथमच कासेगाव (पंढरपूर) येथील आर्वे बंधूंनी आपल्या शेतात सौर ऊर्जेवर चालणारा विद्युत पंप बसवला आहे. यामुळे पिकाला दिवसा पाणी देण्याची सोय झाली आहे.

द्राक्ष बागेत चांगले नाव कमवलेल्या रवींद्र आर्वे आणि बंधूंना खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याचा वारंवार सामना करावा लागत होता. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शेतीला मुबलक पाण्याची सोय झाली, तरीही केवळ विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे त्यांना पिकाला वेळेत पाणी देता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी शेतात सौरऊर्जेवर चालणारा १० अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप बसविला. याकामी त्यांना पंढरपूर येथील विजय इलेक्ट्रीकचे संचालक रामचंद्र कुंभार यांची मदत मिळाली.

या पंपाची वेगवेगळ्या तापमानात चाचणी घेण्यात आली. फाल्कन कंपनीचे रीद्धेश डोबरीया यांच्या ऊपस्थितीत या पंपाची ढगाळ वातावरणातही चाचणी घेतली. ढगाळ वातावरणातही हा पंप चांगला चालत असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी पाहिले. सौरऊर्जेच्या पॅनलचे आयुष्य सुमारे २५ वर्षांचे असून, या पंपाला बॅटरीची गरज नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या वेळी त्यांनी एकूण चार सौरपॅनलमधून ६५० व्होल्ट डीसी, तर यातून कन्वर्ट होऊन ४०० व्होल्ट एसी विद्युत पुरवठा मिळत असल्याचे सांगितले.

विजय इलेक्ट्रीकचे संचालक श्री. कुंभार यांनी सौर ऊर्जेवर चालणारा हा पंप दिवसा २० अंश सेल्सिअस तापमान असतानासुद्धा विहिरीतील पाणी ओढत असल्याचे सांगितले. या वेळी चिराग वाछानी, रोजेश वांग, रजनीश कवठेकर, गजानन रानरूई, लालासाहेब देशमुख, इक्बाल बागवान, प्रताप शिंदे, प्रशांत देशमुख, सुहास इचगावकर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सचिन कुलकर्णि - कोल्हापूर About 340 Days ago
सौर पंप आता काळाची गरज बनला आहे . भविष्यातील विजेचे संकट दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सौर उर्जेचा वापर करावा लागणार आहे . विशेष : शेतीसाठी याची फार गरज फासणार आहे . शासनाने शेतकऱ्यांना या कामी विनाअट अनुदान दिले तरच शेतीसाठी सौर उर्जेचा वापर वाढणार आहे . बाईटस ऑफ इंडियाने ही बातमी जगासमोर आणली . त्याबदद्दल टीमचे मनापासून आभार .
0
0

Select Language
Share Link