Next
‘फ्लिपकार्ट’चे बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून
प्रेस रिलीज
Saturday, September 29, 2018 | 12:03 PM
15 0 0
Share this story

मुंबई : फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ १० ते १४ ऑक्टोबर या काळात आपल्या दी बिग बिलियन डेजच्या (टीबीबीडी) पाचव्या आवृत्तीसह देशातील सणासुदीच्या हंगामाला अधिकृतरित्या सुरुवात करणार आहे.

या कालावधीत ग्राहकांना विविध ऑफर्स मिळतील. १० ऑक्टोबरला फॅशन, टीव्ही व उपकरणे, होम अॅंड फर्निचर, ब्युटी, स्पोर्ट्स, खेळणी, पुस्तके, स्मार्ट उपकरणे, पर्सनल केअर साधने आणि अन्य उत्पादनांचा सेल सुरू होणार आहे. ११ ऑक्टोबरला मोबाइल फोन्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, तसेच अॅक्सेसरीजचा सेल सुरू होईल, तर १२ ते १४ ऑक्टोबरदरम्याने ‘फ्लिपकार्ट’वरील सर्व विभागांमध्ये सेल सुरू होईल.

‘अब इंडिया होगा बजेट से मुक्त’ हा संदेश देणाऱ्या ‘टीबीबीडी’चा उद्देश आहे खरेदीदारांना पैसे देण्याचे अनेकविध पर्याय देऊन बजेटचे निर्बंध दूर करणे. ग्राहकांना त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांवर एक्स्लुसिव्ह ऑफर्स उपलब्ध होणार आहेत. पेमेंटच्या अन्य ऑफर्समध्ये अग्रगण्य बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांवर तसेच बजाज फिनसर्व्हच्या ईएमआय कार्डांवर नि:शुल्क ईएमआयचा समावेश आहे. फ्लिपकार्ट कार्डलेस क्रेडिटसारखे सुलभ वित्तपुरवठ्याचे पर्याय ग्राहकांना ६० हजार रुपयांपर्यंतची क्रेडिट लाइन उपलब्ध करून देत सुलभ हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची मुभा देते. याशिवाय फ्लिपकार्ट पे लेटरच्या माध्यमातून त्यांना आत्ता खरेदी करून सोयीने पैसे भरण्याची सोय उपलब्ध होते.

या इव्हेंटमध्ये ‘फ्लिपकार्ट’ने अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, विराट कोहली या भारतातील सर्वांत मोठ्या सुपरस्टार्ससह अनेक सेलेब्रिटींना सहभागी करून घेतले आहे. याशिवाय ‘फ्लिपकार्ट’ने सोशल मीडियासाठी वेधक पर्सनलाइझ्ड कंटेट तयार करण्यासाठी उद्योगातील आद्य तंत्रज्ञानात्मक नवकल्पनांची मदत घेतली आहे.

ही घोषणा करताना ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, ‘दी बिग बिलियन डेज हा भारतातील सर्वाधिक अपेक्षा असलेला इव्हेंट झाला आहे. भारतातील सणासुदीच्या हंगामाची सुरुवात ही इव्हेंट करून देते आणि यानंतर येणाऱ्या इव्हेंट्ससाठी एक मापदंड प्रस्थापित करते. हे ‘टीबीबीडी’चे पाचवे वर्ष असून, यंदाची इव्हेंट आतापर्यंतची सर्वांत मोठी व सर्वोत्तम ठरेल यावर आम्ही भर देत आहोत.’

‘आमचे विक्रेते व ब्रॅंड्ससोबत गेले काही महिने जवळून काम केल्यानंतर आम्ही भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील ग्राहकांना अजोड, वैविध्यपूर्ण व परवडण्याजोग्या खरेदीचा अनुभव देण्याची योजना आखली आहे. सर्व भारतीयांच्या खरेदीबद्दलच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी यंदा आमच्या सीमा आणखी थोड्या वाढवता येतील अशी आशा आम्हाला वाटते,’ असे कृष्णमूर्ती यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link