Next
‘सॉल्ट’ रेस्टॉरंटचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, February 15 | 03:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरच्या सॉल्ट' रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.

‘हयात पुणे हॉटेलचे महाव्यवस्थापक सुमीत कुमार यांच्या हस्ते एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी पुणे हॉटेलिअर्स असोसिएशनचे सचिव किशोर सरपोतदार, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे सिनेट सदस्य मनोहर चासकर, हयात पुणे हॉटेल मनुष्य बळ विभाग व्यवस्थापक यामिनी बाकरे, ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, खजिनदार मुझफ्फर शेख, महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ हे मान्यवर उपस्थित होते.

‘हे रेस्टॉरेंट महाविद्यालयाच्या आवारात कायम स्वरूपी असणार आहे. विद्यार्थ्यांना हॉटेल संबधित कामाचा प्रत्यक्ष कार्यानुभव मिळावा या प्रमुख हेतूने हे रेस्टॉरेंट सुरू करण्यात आले आहे,’ असे प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमानंतर एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून विशेष जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या जेवणाची थीम ‘ईट टू द बीट’ होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link