Next
रत्नाई महाविद्यालयात व्याख्यानमाला उत्साहात
BOI
Monday, February 18, 2019 | 02:43 PM
15 0 0
Share this story



पुणे : हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे रत्नाई महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान, स्पर्धात्मक परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन या विषयांवर नुकतीच व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.  

या व्याख्यानमालेचे उद्घाटन संस्थेच्या खजिनदार सुरेखा मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या प्रसंगी संस्थेचे संचालक अरुण चांभारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य प्रा. किशोर भागवत, निर्मला आडवळे, व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. किरण गाढवे यांसह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.



या व्याख्यानमालेत ‘भारतीय संविधान’ या विषयावर प्रा. श्रीरंजन आवटे व प्रा. किरण काळे यांनी मार्गदर्शन केले. ‘व्यवसाय मार्गदर्शन’ या विषयावर प्रा. राजेंद्र थोरात व आकाश पाटील यांनी, तर ‘स्पर्धात्मक परीक्षा’ या विषयावर डॉ. विश्वास देशमुख व संजय गोपाळे यांनी मार्गदर्शन केले.

या व्याख्यानमालेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन प्रा. संतोष सुतार यांनी केले. संजय गायकवाड यांनी आभार मानले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link