Next
‘हीलिंग हॅंड्स’तर्फे तपासणी शिबिर
प्रेस रिलीज
Friday, July 27, 2018 | 04:26 PM
15 0 0
Share this story

पुणे : हीलिंग हॅंड्स क्लिनिकतर्फे (एचएचसी) पुण्यातील सर्व केंद्रामध्ये मोफत सल्ला आणि तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
 
शिबिरामध्ये रुग्णांना पाइल्स, फिस्टुला, फिशर, कब्ज आणि एनोरेक्टिक संबंधित सर्व रोगांसाठी विनामूल्य सल्ला दिला जाईल; तसेच हर्निया आणि व्हॅरिकोजच्या आजारामुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांना विशेष वैद्यकीय सल्ला दिला जाईल.

हीलिंग हॅंड्स फाउंडेशन ही ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणारी चॅरिटेबल संस्था आहे, जी असमर्थ आणि गरजू रुग्णांना अर्ध्या दराने वैद्यकीय सुविधा पुरविते. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या संस्थेचा उद्देश आहे.

हीलिंग हॅंड्स फाउंडेशनचा हेतू मोठ्या प्रमाणात समाजात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा वाढवणे आणि सामान्य माणसांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. शिबिरात विशेषत: स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत सल्ला देण्यात येणार आहे. याबरोबरच त्यांना आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैली विषयी सल्ला देण्यात येईल.

शिबिराविषयी :
कालावधी :
२८ जुलै ते तीन ऑगस्ट २०१८
वेळ : सकाळी १० वाजल्यापासून
स्थळ : पुणे स्टेशन रोड, सालुंके विहार, बाणेर, चिंचवड आणि चाकण.
विनामूल्य नोंदणीसाठी संपर्क :
पुणे स्टेशन : ८८८८२ ८८८८४
बाणेर : ८८८८६ २२२२१
पिंपरी-चिंचवड : ८८८८२ ००००४
साळुंके विहार : ‭८८८८५ २२२२६
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link