Next
ईदनिमित्त विद्यार्थ्यांची ‘अभिवादन मिरवणूक’
प्रेस रिलीज
Saturday, December 02 | 05:11 PM
15 0 0
Share this story

 हजरत अभिवादन मिरवणूकीत सहभागी झालेले एम. सी. ई संस्थेचे  विद्यार्थी,  विद्यार्थीनी, शिक्षक, पालक आदीपुणे : मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या अल्पसंख्यांक समाजातील पाच हजार विद्यार्थी आणि शिक्षक यांनी शनिवारी हजरत अभिवादन मिरवणूक काढली.


मिरवणूकीचे उद्घाटन  एम. सी. ई. सोसायटी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणूकीचे नेतृत्व केले.आझम कॅम्पस गेट नं. एक  येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. पुढे डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, ‘ट्राय लक' हॉटेल, गाय कसाब मशीद, बाबाजान दर्गा, सरबतवाला चौक, हुसैनीबाग, क्वार्टर गेट, मॉडर्न बेकरी, इस्लमपुरा, ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत थिएटर, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, पूना कॉलेज मार्गे आझम कॅम्पस गेट नं. दोन  येथे मिरवणुकीची सांगता झाली. 

विद्यार्थ्यांनी हजरत मोहम्मद पैगंबरांनी दिलेल्या  ‘पढो और पढाओ’, ‘कलम की ताकद सबसे बडी ताकद’, ‘बदल मन की सोच’, 'बेटी नही है बोझ', 'बेटी बढाओ बेटी पढाओ', 'बेटी को मत समझो भार, जीवन का है ये आधार' आदी संदेशांच्या घोषवाक्याचे फलक धरले होते.

मिरवणुकीत डॉ. शैला बूटवाला, डॉ. किरण भिसे, डॉ. भूषण पाटील, शाहिद इनामदार, वाहिद बियाबानी, सिकंदर पटेल, शाहिद मुनीर शेख, चाँदशेख सरदार, प्रा. गफार सय्यद, हाजी इम्तियाज शेख यांच्यासह एम.सी.ई. सोसायटीच्या सर्व संस्थातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७वे वर्ष आहे. दरवर्षी एम. सी. ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link