Next
‘आधार’ संबंधित व्यवहारांसाठी अॅक्सिस बँकेची ‘आयरिस’ प्रमाणीकरण सुविधा
मायक्रो एटीएम्समध्ये प्रथमच बायोमेट्रिक प्रमाणीकरण
प्रेस रिलीज
Thursday, August 16, 2018 | 05:20 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : देशात प्रथमच अॅक्सिस बँकेने ‘आधारक्रमांका’शी निगडीत व्यवहारांसाठी मायक्रो एटीएम टॅब्लेट्सद्वारे आयरिस स्कॅन प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध केली आहे.  या सेवेसाठी ग्राहकांना त्यांच्या टॅब्लेटवर त्यांचे आयरिस स्कॅन करावे लागणार असून, या सुविधेमुळे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सफाईदार होईल. 

मायक्रो एटीएम्समुळे डेबिट कार्ड, पासवर्ड, पिन, युजर आयडी यांची आवश्यकता भासत नाही. ग्राहकाला केवळ त्याचे आधार कार्ड आणि बायोमेट्रिक्स (आयरिस स्कॅन/बोटांच्या ठशांचे स्कॅन ) वापरून ही सुविधा वापरता येईल. बँकेने अतिशय सुरक्षित आयरिस सुविधा असलेले मायक्रो एटीएम टॅब्लेट्स कार्यान्वित केले आहेत. हे एसटीक्यूसी प्रमाणित, आयरिस सेन्सर्सचा संपूर्ण समावेश असलेले आणि यूआयडीएआय नोंदणीकृत उपकरण आहे. आयरिस स्कॅन तंत्रज्ञान पूर्णतः विनासंपर्क काम करणारे असून, त्याचे प्रमाणीकरण अचूक ठरण्याचा दर ९८.२ टक्के (इंटरनॅशनल सेंटर फॉर बायोमेट्रिक रिसर्चने केलेल्या अभ्यासानुसार) आहे.

नव्या सुविधेविषयी बँकेच्या रिटेल बँकिंग विभागाचे कार्यकारी संचालक राजीव आनंद म्हणाले, ‘आधारशी संबंधित व्यवहारांसाठी आयरिस प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. आयरिस स्कॅनद्वारे व्यवहाराची प्रक्रिया करणे अतिशय सोपे आहे. ग्राहकाला रोख पैसे काढणे, रक्कम हस्तांतरीत करणे अशा आपल्याला आवश्यक त्या सेवेची निवड करावी  लागेल आणि मायक्रो एटीएममध्ये त्यांचा आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर त्यांना प्रमाणीकरणासाठी ‘आयरिस’ची निवड करावी लागेल. टॅब्लेटमध्ये बसवलेल्या आयरिस सेन्सर कॅमेऱ्याद्वारे केवळ तीन ते पाच सेकंदांत ग्राहकाच्या डोळ्यांचे स्कॅन करून प्रमाणीकरण केले जाईल. बायोमेट्रिक तपशीलांची यूआयडीएआय डेटाबेसमध्ये पडताळणी झाल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल.’

‘सध्या बॅंकेतर्फे  ग्रामीण भागातील आठ शाखांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येत असून, त्यात पंजाब, हरियाणा, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील शाखांचा समावेश आहे. त्याशिवाय बँक कर्ज प्रक्रिया, विमा, ईकेवायसी, खाते उघडणे या व अशा इतर सेवांसाठी आयरिस आधारित प्रमाणीकरण सेवा सुरू करण्याच्या विचारात असून, त्यानंतर निमशहरी व शहरी भागात त्याची अंमलबजावणी केली जाईल’, असेही मेहरा यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search