Next
रक्तदान करून शहिदांना वाहिली श्रद्धांजली
हिमायतनगर येथील युवकांचा पुढाकार
नागेश शिंदे
Wednesday, March 06, 2019 | 01:18 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ हिमायतनगर शहरातील युवकांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पुलवामा येथून कर्तव्यावर जाणाऱ्या जवानांच्या वाहनाला दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला. यात ‘सीआरपीएफ’चे ४० जवान शहीद झाले होते. या शहिदांच्या स्मरणार्थ हिमायतनगर शहरातील युवकांनी महाशिवरात्रीच्या पर्वावर परमेश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १००हून अधिक जणांनी रक्तदान केले.

रक्त संकलनासाठी हुजुर साहिब रक्तपेढी आणि नांदेडमधील गुरू गोबिंद सिंघ ब्लड बँक यांच्या पथकातील सुमित महाबळे, डॉ. कनकदंडे, शाम मुनेश्वर, ओम ठाकूर, गोलू सूर्यवंशी, ज्योती खोडे, ऋतुजा कदम, प्रियंका देवुलवाड, कपिल वाढवे, उद्धव मुळे, संदीप धृतराज, बाबुराव माने उपस्थित होते.

व हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजक राम सूर्यवंशी, बालाजी बलपेलवाड, सचिन माने, विपुल दंडेवाड, वैभव शिंदे, परमेश्वर भोयर, नितेश जैस्वाल यांनी प्रयत्न केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link