Next
जीवन समजून घेताना
BOI
Friday, May 24, 2019 | 10:32 AM
15 0 0
Share this article:

आपले वैयक्तिक आयुष्य, आपले नातेसंबंध, आपले कार्यक्षेत्र आणि आपले सामाजिक योगदान या जीवनाच्या चार महत्त्वाच्या भागांमध्ये समतोल साधता आल पाहिजे, असे गौर गोपाल दास यांनी म्हटले आहे. यानुसार ‘जीवन समजून घेताना...’ मधून मन:शांती, सुदृढ नाती आणि संतुलित आयुष्याचे रहस्य त्यांनी उघड केले आहे. 

‘संवेदनशीलता’ हादेखील या चारही चाकांमध्ये समतोल साधण्यासाठीचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. असेच वेगवेगळे, अनेकदा आपल्याकडून जाणूनबुजून किंवा अनवधानाने दुर्लक्षित होणारे महत्त्वाचे मुद्दे लेखकाने या पुस्तकात मांडले आहेत. हॅरी आणि ललिता अय्यर या प्रमुख पात्रांच्या माध्यमातून मांडलेली ही गोष्ट आहे. समस्या, स्पर्धा, स्व-शोध, सेवा-भाव यातून जीवनाच्या गाडीचा चार चाकांचा तोल कसा पेलला जातो हे त्यांनी सहज पटेल अशा पद्धतीने सांगितले आहे. 

समतोलाचे तत्त्व स्पष्ट करताना दास यांनी वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंग मोकळेपणाने, खुलेपणाने वाचकांसमोर मांडले आहेत. प्रवासाचा-नात्यांमधील परस्पर सामंजस्याचा पाया ‘अध्यात्म’ असल्याचे सांगत यावरही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

पुस्तक : जीवन समजून घेताना
लेखक : गौर गोपाल दास
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाउस
पाने : २०३
किंमत : २२५ रुपये 

(या पुस्तकाचे प्रकाशन २६ मे २०१९ रोजी होत आहे. त्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


(गौर गोपाल दास यांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search