Next
‘अँटी करप्शन कमिटी’तर्फे शहीदांना अभिवादन
प्रेस रिलीज
Monday, March 25, 2019 | 04:52 PM
15 0 0
Share this article:



पुणे : अँटी करप्शन कमिटी आणि कॉर्नर टेम्पो स्टॅंड  पुष्पमंगल कार्यालय बिबवेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त व शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी राष्ट्रभक्तीपर गीते सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अँटी करप्शन कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माहिती संघटक अनिता मुनोद, अनिल आगवणे, तानाजी लवांडे, कीर्ती दुगड, अशोक कुंकूलोळ आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.



अँटी करप्शन कमिटी पुणे शहर अध्यक्षपदी सूर्यकांत फाळके यांच्या नेमणुकीबद्दल विजयकुमार मर्लेचा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मर्लेचा म्हणाले, ‘भगतसिंग यांचे देशासंबंधित स्वप्न अजूनही अपुरे आहे. देशात जात, धर्म पंथ अशा गोष्टींवरून वाद होऊ नये, ही त्यांची आशा होती. पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search