Next
तथागत बुद्ध- चरित्र आणि तत्त्वज्ञान
BOI
Thursday, April 04, 2019 | 10:12 AM
15 0 0
Share this article:

विवेक, करुणा व ज्ञानाने लोककल्याणाच्या ध्येयाने गौतम बुद्धांनी राजवैभवाचा त्याग केला. तत्कालीन वर्णव्यवस्थेला छेद देत माणसातील स्वत्व जागे केले. मानवाचा पशुत्वाचा मुखवटा काढून मनुष्यत्वाचा ‘चेहरा’ देण्याचा प्रयत्न बुद्धांनी केला. त्यानंतर हजारो वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध तत्त्वज्ञान आपलेसे करीत वंचित, मागासांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. आंबेडकर यांनी भारतीय समाजाला बौद्ध धर्माचा परिचय करून दिला. हे विचार डॉ. प्रशांत गायकवाड यांनी ‘तथागत बुद्ध’मधून मांडून बाबासाहेबांचा बुद्धांविषयीचा दृष्टीकोन सोप्या भाषेत समजावून दिला आहे.

यात सात प्रकरणे असून, प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी, ‘प्रास्ताविक’ व शेवटी ‘समारोप’ केला आहे. भगवान बुद्धांचे जीवन व चरित्रांमधून त्यांचे बालपण व बुद्धांपर्यंतच्या प्रवास, बुद्धांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धम्म व नीतीविषयक विचार स्पष्ट केले आहे. मराठी साहित्यामधील गौतम बुद्धांवर आक्षेप, निवडक मराठी आणि अनुवादित साहित्यातील बुद्ध, बुद्धचरित्र व विचार मांडणाऱ्या मराठी साहित्यकृतींच्या भाषाशैलीचा अभ्यासाचा आढावाही घेतला आहे.

पुस्तक : तथागत बुद्ध- चरित्र आणि तत्त्वज्ञान
लेखक : प्रशांत गायकवाड
प्रकाशक : लोकायत प्रकाशन
पाने : ३८४
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 1 Days ago
Its philosophy is oriented towards individuals . In this is respected in the West .
0
0

Select Language
Share Link
 
Search