Next
पिनिनफरिना बॅटिस्टा- जगातील पहिली इलेक्ट्रिक लक्झरी कार सादर
इटालियन सौंदर्य आणि शक्तीचा अनोखा अविष्कार
BOI
Tuesday, March 05, 2019 | 06:42 PM
15 0 0
Share this story


जीनिव्हा : जगातील पहिली संपूर्णपणे इलेक्ट्रिक लक्झरी कार ‘जीनिव्हा ऑटो शो’मध्ये सादर करण्यात आली. जीनिव्हातील हायपरकारच्या वर्ल्ड प्रीमिअरमध्ये बॅटिस्टाची तीन सुंदर मॉडेल सादर करण्यात आली असून, इलेक्ट्रिक कार कशी असावी, याचा नवा आदर्श आहेत. इटलीतील पिनिनफरिना बॅटिस्टा या नामांकित कंपनीने या अत्यंत देखण्या आणि पर्यावरणपूरक कारची निर्मिती केली आहे. पुढील वर्षी ही कार जागतिक बाजारपेठेत दाखल होणार असून, इटलीत केवळ १५० कार्सची निर्मिती केली जाणार आहे. 


‘पुढील वर्षी २०२० मध्ये ती रस्त्यावर उतरेल. हे पिनिनफरिना एसपीए डिझाइन हाउसच्या नव्वदाव्या वर्धापनदिनाचे वर्ष आहे. बॅटिस्टा ही इटलीमध्ये डिझाइन व निर्मिती झालेली आजवरची सर्वात शक्तिशाली कार असेल. ती इंटर्नल कम्बशन तंत्रज्ञान असणाऱ्या आजच्या कोणत्याही रोड-लिगल स्पोर्ट्स कारला शक्य नसेल अशी उच्च कामगिरी करेल. सध्याच्या फॉर्म्युला वन रेस कारपेक्षा वेगवान असणारी ही कार झीरो एमिशन पॅकेजमध्ये उत्कृष्ट अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यांची सांगड घालणार आहे. महिंद्रा रेसिंगबरोबरच्या भागीदारीने आणि निक हेडफेल्ड,पीटर टट्झर व रेने वुलमन यांच्या तज्ज्ञ सल्ल्याने ‘रेस-टू-रोड’ टेक्नालॉजी ट्रान्स्फर साध्य होणार आहे. लक्झरी इलेक्ट्रिक कारसाठी ही आदर्श असणार आहे. यानिमित्ताने केवळ एक नवी कार सादर झालेली नाही, तर ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी एक नवा क्षण, नवी संकल्पना साकार झाली आहे,’ ऑटोमोबिली पिनिनफरिनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल पर्श्के यांनी सांगितले.  


‘पिनिनफरिना कुटुंबाचे, संस्थापक बॅटिस्टा, त्यांचा मुलगा सर्जिओ व नातू व पिनिनफरिना एसपीए अध्यक्ष पाओलो यांचे स्वप्न साकार करणारी ही कार आहे. झीरो एमिशन हे नवे लक्ष्य साध्य करणारी, ही पहिली केवळ पिनिनफरिना नाव असणारी कार आहे आणि ती अप्रतिम कामगिरी करणारी आहे,’ असे मायकल पर्श्के यांनी नमूद केले. 


‘बॅटिस्टाने स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. भविष्यातील सुंदर, नावीन्यपूर्ण, झीरो-एमिशन इलेक्ट्रिक कारच्या नावामध्ये त्यांच्या कुटुंबाचे नाव पहिले लिहिले जाणार आहे,’ असे पाओलो पिनिनफरिना यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link