Next
‘ई-पेलेटर’चा ‘क्रोमा’सह सहयोग
प्रेस रिलीज
Friday, April 06, 2018 | 01:07 PM
15 0 0
Share this story

मुंबई : निर्धारित कालावधीसाठी व्याजमुक्त क्रेडीट प्रदान करणाऱ्या भारताच्या अग्रगण्य देयक समाधान ‘ई-पेलेटर’ने भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक वितरण साखळी असलेल्या ‘क्रोमा’सह सहयोग जोडला आहे. या सहयोगाअंतर्गत क्रोमाच्या ऑनलाईन ग्राहकांना ‘ई-पेलेटर’च्या ‘आधी खरेदी करून नंतर पेमेंट करा’ या अभिनव सुविधेचा लाभ घेता येईल.

ग्राहक आता आपल्या आवडीच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची खरेदी करून तात्काळ त्यांची घरपोच डिलिव्हरी घेऊ शकतात आणि ‘ई-पेलेटर’चा वापर करून १४ दिवसांच्या आत आपण घेतलेल्या उत्पादनाचे पेमेंट करू शकतात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना पेमेंट पर्यायांमध्ये ‘ई-पेलेटर’ पेमेंटची निवड करावी लागेल आणि नंतर पेमेंट करण्यासाठी एक अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यावर वापरकर्त्याला खर्चाची मर्यादा कळवली जाईल ज्याचा उपयोग ‘ई-पेलेटर’च्या भागीदार नेटवर्कमध्ये खरेदीसाठी करता येऊ शकतो.      

‘ई-पेलेटर’चे सहसंस्थापक ऑर्को भट्टाचार्य म्हणाले की, ‘ई-पेलेटर आणि ‘क्रोमा’ सर्वोत्कृष्ट ग्राहक अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि या सहयोगाच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदीशी निगडित निष्क्रियता आणि बिघाडापासून वाचण्यावर आमचे लक्ष्य आहे. ‘ई-पेलेटर’च्या माध्यमातून ग्राहकांना उत्पादनाच्या डिलिव्हरीनंतर पेमेंट करण्याची सुविधा मिळते. या सुविधेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, एकत्रितपणे नवीन आणि चांगले समाधान देण्यावर आमच्या भागीदारीचा भर असेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link