Next
भारत सासणे, मंगेश पदकी
BOI
Tuesday, March 27, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘अस्तित्व किंवा रक्त पणाला लागले की साहित्यिक लिहू लागतो’ असं म्हणणारे भारत सासणे आणि कथाकार मंगेश पदकी यांचा २७ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी.....
...... 
भारत सासणे

२७ मार्च १९५१ रोजी जन्मलेले भारत सासणे हे दीर्घकथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनामध्ये गूढ वातावरण, मानवी मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न, समाजातल्या चुकीच्या चालीरीती आणि अपप्रवृत्तींवर भाष्य केलेलं असतं. त्यांनी लहान मुलांसाठी रहस्यकथा लिहिल्या आहेत.

ते २०१० सालच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तसंच २०१४ सालच्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 

अदृष्ट, अनर्थ रात्र, अस्वस्थ, आतंक, आयुष्याची छोटी गोष्ट, ऐसा दुस्तर संसार, कँप/बाबींचं दुःख, चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा, चिरदाह, जंगलातील दूरचा प्रवास, जॉन आणि अंजिरी पक्षी, त्वचा, दोन मित्र, नैनं दहति पावकः, बंद दरवाजा, मरणरंग, राहीच्या स्वप्नांचा उलगडा, लाल फुलांचे झाड, वाटा आणि मुक्काम, रात्र, शुभ वर्तमान, सटवाईचा लेख, स्यमंतक मण्याचे प्रकरण, क्षितिजावरची रात्र असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

(भारत सासणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 
..........

मंगेश भगवंत पदकी 

२७ मार्च १९२३ रोजी जन्मलेले मंगेश पदकी हे कथाकार म्हणून ओळखले जातात. 

काशाभट, खारीची पिल्ले, जिवलग मज काहींचे, यक्षगण, राव जगदेव मार्तंड अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१८ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.  

(मंगेश पदकी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link