Next
‘जिज्ञासा’तर्फे ‘धम्माल शिबिर २०१८’चे आयोजन
BOI
Monday, April 02 | 04:10 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : ‘जिज्ञासा थिएटर्सतर्फे गेली ३४ वर्षे विविध कलागुणांचे वैविध्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. या वर्षीही मे महिन्याच्या सुट्टीत वय सहा ते अगदी १०६ वर्षांपर्यंत सर्वांसाठी एक आगळे वेगळे धम्माल शिबिर संस्थेतर्फे आयोजित केले आहे. म्हणजेच अगदी लहान बालकापासून वयोवृद्धांनाही आनंद घेण्याची संधी ‘जिज्ञासा’तर्फे मिळवून देण्यात येणार आहे. समाजातील सर्वच घटकांना सामावून घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे,’ अशी माहिती नाट्यशास्त्र तज्ज्ञ अक्षता भोळे-इंचल यांनी दिली.

उन्हाळी सुट्टी सुरू झाली, की लहान मुलांपासून ते अगदी घरातील ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनांच या सुट्टीत काय करायचे, हा प्रश्न भेडसावत असतो. आज्जी-आजोबांपासून नातवांपर्यंत सर्वांनाच समाविष्ट करून घेणाऱ्या या धम्माल शिबिरासाठी सहभागी होणाऱ्या शिबिरार्थींची पाच वयोगटात विभागणी करण्यात आली आहे. छोटा गट वय वर्षे सहा ते नऊ, लहान गट वय वर्षे १० ते १५, युवक गट वय वर्षे १६ ते ३५, मोठा गट वय वर्षे ३६ ते ५५ आणि ज्येष्ठ गट वय वर्षे ५६ ते १०६ अशा गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटासाठी मर्यादीत प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
    
अधिक माहिती देताना अक्षता म्हणाल्या, ‘हे शिबिर पाच ते २७ मे २०१८ या कालावधीत (रविवार सोडून) रत्नागिरीतील अ. के. देसाई हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले असून, निवड झालेल्या शिबिरार्थींना हस्तकला, चित्रकला, रंगकला, मूर्तीकला, मुखवटे, खेळ, जादू, नृत्य, नाट्य, संगीत अशा विविध प्रकारांतील धम्माल अनुभवता येणार आहे. सर्व प्रकारच्या ज्ञानासाठी विविध शास्त्रीय कृतींचा वापर करून त्यामधून मनोरंजन आणि कला अशा दोन्ही गोष्टींचा लाभ या शिबिरात होणार आहे.’
 
लहान मुले व युवती-माता यांचे गट सकाळच्या सत्रात, तर युवक व ज्येष्ठांचे गट सायंकाळच्या सत्रात घेण्यात येतील. शिबिर सुरू होण्यापूर्वी साधारण एक आठवडा अगोदर सहभागी झालेल्या सर्वच शिबिरार्थींचा एक व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करण्यात येईल. शिबिराविषयी काही सूचना असतील, तर त्या आवर्जून कराव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सर्वच गटातील शिबिरार्थींना लागणारे सर्व प्रकारचे सुमारे रूपये एक हजार ५०० रुपयांपर्यंतचे साहित्य आयोजकांतर्फे पुरविण्यात येणार आहे. बनविलेले साहित्य, कलाकृती, मुखवटे शिबिरार्थींना घरी घेऊन जाता येणार आहे. शिबिराच्या कालावधीत सर्वच गटांना दररोज एकदा अल्पोपहार देण्यात येईल. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क भरावे लागणार नाही. संपूर्ण शिबिराची शुल्क प्रत्येकी चार हजार रुपये असून, प्रवेश घेण्यापूर्वी शुल्क भरणे अत्यावश्यक आहे.

‘ज्येष्ठ नागरिकांना विविध करमणुकीसह आरोग्याविषयीचे मार्गदर्शनही करण्यात येईल; तसेच पन्नाशीनंतर उद्‌भवणाऱ्या समस्या, ग्रहमानानुसार होणारे बदल, त्यापासून घेण्याची काळजी आदींचे मार्गदर्शन ज्योतिषाचार्य प्रसन्न मुळ्ये करणार आहेत. ‘जिज्ञासा’चे अध्यक्ष सुहास भोळे यांच्यासह अक्षता भोळे, जादुगार विनयराज, सिनेनाट्य कलावंत राजकिरण दळी व लहु घाणेकर आदींचे मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे; तसेच ‘जिज्ञासा’ची दोन शिबिरे यशस्वीपणे पूर्ण केलेले देवव्रत पवार व शर्वाणी ढवळे यांचीही साथ लाभणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क :
सुहास भोळे : ८३२९४ ३३७२३, ९४२२४ ३२३८८
विनयराज उपरकर : ९८५०२ ६९९६३,
डॉ. प्रसन्न मुळ्ये : ९४०५३ ३४५५३,
राजकिरण दळी : ७३५०४ १७२१७,
ज्योती अवसरे-मुळ्ये : ८२७५३ ९२३२६.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link