Next
एप्रिलमध्ये ‘खिचडी’चे प्रसारण
प्रेस रिलीज
Tuesday, March 27 | 03:44 PM
15 0 0
Share this story



मुंबई : आपल्या ‘खिचडी’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या आवृत्तीच्या प्रसारणाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजन आणि हास्याचा दुहेरी डोस देण्यास ‘स्टार प्लस’ वाहिनी सज्ज झाली आहे. ‘खिचडी’च्या प्रसारणास पुढील महिन्याच्या मध्यास प्रारंभ होईल. ही मालिका दर शनिवार-रविवारी प्रसारित होईल आणि तिचा प्रत्येक भाग एका तासाचा असेल.

‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धा सुरू होत असतानाच या मालिकेचे प्रसारण सुरू करण्याविषयी निर्माते प्रारंभी काहीसे साशंक होते; पण जे. डी. मजिथिया यांच्या मते क्रिकेट आणि मनोरंजन हे सामायिक विषय आहेत. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम मालिकेच्या प्रेक्षकसंख्येवर होणार नाही.

मजिथिया म्हणाले, ‘आयपीएलमुळे या मालिकेला नवा प्रेक्षकवर्ग लाभेल, असे मला वाटते. क्रिकेट आणि कॉमेडी हे एकत्र नांदू शकतात. क्रिकेटचे सामने कंटाळवाणे झाले, तर हे प्रेक्षक ‘खिचडी’कडे वळू शकतात. आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या वेळी मनोरंजन मालिकांच्या प्रेक्षकसंख्येत १०-१५ टक्के घट होते, हे मला ठाऊक आहे; पण क्रिकेट स्पर्धांचे प्रसारण करणाऱ्या नेटवर्कच्या वाहिनीवरच आमची मालिकाही असल्याने त्यात फार फरक पडेल, असे वाटत नाही.’

‘नव्या स्वरूपातील खिचडी अधिक रंजक करण्यासाठी त्यात रेणुका शहाणे, दीपशिखा नागपाल आणि बख्तियार इराणी यासारखे नवे कलाकारही समाविष्ट करण्यात आले आहे. अनंग देसाई, सुप्रिया पाठक, वंदना पाठक आणि राजीव मेहता यासारखे मालिकेतील मूळ कलाकार नव्या स्वरूपातील मालिकेतही कायम राखण्यात आले आहेत. या मालिकेतील मूळ कलाकारांमुळे प्रेक्षक तिच्याकडे वळतीलच शिवाय नव्या चेहऱ्यांमुळेही या मालिकेबद्दलची उत्सुकता वाढून तिच्याकडे अधिक प्रेक्षक आकृष्ट होतील,’ असा विश्वास मजिथिया यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link