Next
‘आयएनआयएफडी’मध्ये ‘लर्न फ्रॉम मनीष मल्‍होत्रा’
प्रेस रिलीज
Monday, May 21 | 12:42 PM
15 0 0
Share this storyपुणे : फॅशनविषयक विशेष ज्ञान आणि प्रशिक्षण ऑनलाइन देण्यासाठी बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन आयकॉन मनीष मल्‍होत्रा यांनी ‘आयएनआयएफडी’ आणि ‘एलएसटी’ यांच्याशी हातमिळवणी केली असून, सध्याच्या शैक्षणिक सत्रापासून हा अभ्यासक्रम उपलब्‍ध होणार आहे.  

तंत्रज्ञानाचा वापर करून, विशेष व्हिडीओ व्याख्याने आणि ऑनलाइन शिक्षण साहित्‍याच्या माधमातून मनीष फॅशन आणि बॉलिवूड चित्रपटांतील आपल्‍या गेल्या २८ वर्षांतील अनुभवाविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. बॉलिवूडमधील पोशाखापासून ते वधू-वरांचा पोशाख आणि पुरुषांचा पेहराव ते फॅशन सप्ताहासाठीची तयारी अशा विविध विषयांवर मनीष विशेष व्याख्याने देणार आहेत.  

मनीष मल्होत्रा ​​आपले ज्ञान ऑनलाइन शेअर करीत असतानाच, भारतातील ‘आयएनआयएफडी’ केंद्रांमधील प्रमाणित अध्यापक विभाग उदयोन्मुख डिझायनर्सच्या करिअरला आकार देण्यासाठी आवश्यक ती कौशल्‍ये प्रदान करणार आहेत. फॅशन शिक्षणाच्या या अभूतपूर्व मिश्रणामुळे शिक्षणपद्धतीत क्रांती घडणार आहे. कारण, आता देशातील कोणत्‍याही भागातून विद्यार्थी डेडिकेटेड अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ बोटाच्या स्‍पर्शाने महागुरू मनीष मल्‍होत्रा यांची व्याख्याने पाहू शकतील.

‘आयएनआयएफडी’च्या कॉर्पोरेट संचालक रितू कोचर, अशोक कौशिक आणि लंडन स्‍कूल ऑफ ट्रेंड्सचे कार्यकारी संचालक सनी सोमरा यांच्या उपस्‍थितीत मनीष यांनी ‘लर्न फ्रॉम मनिष मल्‍होत्रा’ या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या वेळी ‘आयएनआयएफडी’च्या कॉर्पोरेट संचालिका कोचर म्‍हणाल्‍या, ‘लवकरच ‘लर्न फ्रॉम मनिष मल्‍होत्रा’ हा कार्यक्रम प्रत्‍यक्ष फॅशन जगताची ओळख अशा मनिष मल्‍होत्रांकडून फॅशनविषयी सखोल ज्ञान आणि प्रत्‍यक्ष अनुभव घेऊ पाहणार्‍या प्रत्‍येक फॅशनप्रेमी नागरिकासाठी उपलब्‍ध होणार आहे.’

डेक्कन ‘आयएनआयएफडी’चे केंद्र संचालक अमर खत्री आणि अशोक दर्यानी म्हणाले, ‘२०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश घेतलेल्‍या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित अभ्यासक्रमाचा भाग म्‍हणून ‘लर्न फ्रॉम मनीष मल्‍होत्रा’ ही विशेष संधी प्राप्त होणार आहे.’

सन्माननिय अतिथी, मिसेस युनिव्हर्स अरब एशियाच्या (भारत) स्पर्धक खुशबू कारवा यांच्या उपस्‍थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. फिलिपाइन्स येथे डिसेंबर महिन्यात त्‍या जगभरातील अघाडीच्या स्‍पर्धकांबरोबर स्‍पर्धा करणार आहेत. हे स्‍थान प्राप्त करण्यासाठी अपार मेहेनत घेतलेल्‍या महिलेच्या हातून या ऐतिहासिक आणि प्रतिष्‍ठेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ ही अतिशय गौरवास्‍पद बाब होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link