Next
मुंबईत सामाजिक बांधिलकीतून करणार डॉ. आंबेडकरांना अभिवादन
मिलिंद जाधव
Friday, April 05, 2019 | 11:20 AM
15 0 0
Share this article:

भिवंडी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ओन मीडिया (Own Media) व मुंबईतील युवा कार्यकर्त्यांच्या वतीने भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी भिवाली  श्री गाडगे महाराज आश्रम शाळा येथे सहा एप्रिल २०१९ रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजातील काही विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनाच्या मूलभूत गरजा भागवणे ही कठीण जाते. त्यामुळे शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येते. ही बाब लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय वयातच महामानवांचा इतिहास माहिती व्हावा, त्यांचे विचार प्रत्येकामध्ये रुजावे या हेतूने मुंबईतील युवा कार्यकर्ते या दिवशी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क : सिद्धार्थ चाबुकस्वार- ७०२१० ०७७२८.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search