Next
‘एज्युकेअर’तर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर
BOI
Wednesday, April 17, 2019 | 11:25 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : येथील एज्युकेअर फाउंडेशनतर्फे या वर्षीच्या सुट्टीत २२ ते २८ एप्रिल या कालावधीत शहरातील संस्कार प्लेस्कूल व पाळणाघर येथे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तीन ते १३ वर्षे वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी असलेले हे शिबिर सकाळी ९.३० ते दुपारी १.३० व दुपारी तीन ते सायंकाळी सात अशा मर्यादित संख्येच्या दोन वेगवेगळ्या बॅचमध्ये होणार आहे.

‘एज्युकेअर’तर्फे विद्यार्थांसाठी नेहमीच विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे, उपक्रमांचे व कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात योग, ध्यान, हस्तकला, चित्रकला, मातीकाम, तसेच वेगवेगळे खेळ घेण्यात येणार आहेत. शिबिरासाठी लागणारे आवश्यक सर्व साहित्य आयोजकांकडून उपलब्ध करून दिले जाणार असून, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू त्यांना घरी घेऊन जाता येणार आहेत.

रत्नागिरी शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून आपली नोंदणी आयोजकांकडे करावी, असे आवाहन ‘एज्युकेअर’च्या संचालिका सोनाल सावंत यांनी केले आहे.

शिबिराविषयी :
कालावधी :
२२ ते २८ एप्रिल २०१९
वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी तीन ते सायंकाळी सात
स्थळ : संस्कार प्लेस्कूल व पाळणाघर, डॉ. प्रसन्न मुळ्ये यांच्या घराच्यामागे, सत्यशोधक प्रेस समोरची गल्ली, टिळक आळी, रत्नागिरी.
संपर्क : सोनल सावंत- ९८९०३ ७१९२४, दिव्या पाटील- ९२०९९ ४१७९८, ऑफिस- ८५३०१ ६३५८०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search