Next
डोंबिवलीत रंगले महामानवांच्या विचारांचे कवी संमेलन
मिलिंद जाधव
Monday, July 22, 2019 | 05:03 PM
15 0 0
Share this article:


डोंबिवली : चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन ठाणे, बहुउद्देशीय मानवसेवा सामाजिक संस्था भिवंडी, कवी कट्टा गृप कल्याण-मुंबई, माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था भिवंडी, स.सु.स. आणि लाख मोलाच्या कविता काव्यमंच कल्याण, विकास प्रबोधिनी संस्था भांडूप, रामवेणू काव्य मंच दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महामानवांच्या विचारांचे कवी संमेलन’ डोंबिवली पश्चिम येथील जोंधले हायस्कूल शनिवार आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे होते. संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, विजयकुमार भोईर, सुरेखा गायकवाड, कवी दीप यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ साहित्यिक, विचारवंत राजाभाऊ ढाले यांना कवींच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. 


या वेळी बोलताना संमेलनाध्यक्ष अॅड. प्रज्ञेश सोनावणे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. बलुतेदार-अलुतेदार, अठरा पगड जातींना जोडून आणि सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. हिंदू मुस्लिम, ब्राह्मणेतर वर्गाला सोबत घेऊन प्रत्येक सैनिकांना ‘मावळा’ ही पदवी दिली. त्यामुळे महाराष्ट्र उभा राहिला. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे महात्मा ज्योतिबा फुलेंनी भारतातील जातीयव्यवस्थेला छेद देऊन समस्त स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली आणि आज भारतीय महिला स्वाभिमानाने जगत आहे. फुले आणि आंबेडकरांना जोडणारा दुवा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय. स्वतःच्या राज्यात ५० टक्के बहुजन समाजाला आरक्षणाची तरतूद करणारे खरे समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज होय आणि आरक्षणाला संविधानिक दर्जा देऊन संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रतिनिधित्व बहाल केले. देशात क्रांती घडवून आणणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. या महामानवांनी केलेला प्रचंड त्याग आणि त्यांच्या संघर्षाला जगात कुठेच तोड नाही. मानवमुक्तीच्या लढ्यातील प्रणेते आहेत आणि त्यांच्या आदर्श घेऊन आज आम्ही सर्व जाती-जातींना जोडून महामानवांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहोत. जातीयव्यवस्था नष्ट करण्यासाठी, सर्व जातींना जोडणे आवश्यक आहे.’  
 
या संमेलनात नवनाथ रणखांबे, जगदेव भटू, विजयकुमार भोईर, मिलिंद जाधव, कवी दीप, अशोक कांबळे, विष्णु खांजोडे, सुरेखा गायकवाड, मनिषा मेश्राम, प्रतिभा सोनावणे, वृषाली माने, उदय क्षीरसागर, चेतन जाधव, संघरत्न घनघाव, ज्योती गोळे, गणेश गावखडकर, कामिनी धनगर, शंकर घोगरे या कवींनी महामानवांच्या विचारधारेवर आधारित, स्वरचित कविता सादर केल्या. सहभागी कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार कवी दीप यांनी केले. सूत्रसंचालन युवा कवी मिलिंद जाधव यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search