Next
‘मार्ग इआरपी’ची ‘आयसीआयसीआय बॅंके’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Saturday, June 16, 2018 | 04:43 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बॅंकेने ‘मार्ग इआरपी’ या कंपनीच्या सहकार्याने सूक्ष्म, लघु व मध्यम कंपन्यांसाठी (एमएसएमइ) एक नवीन पेमेंट यंत्रणा विकसीत केली आहे. यामध्ये ‘मार्ग’चे अकाऊंटींग सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे.

आयसीआयसीआय बॅंक ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असून, मार्ग इआरपी ही एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (इआरपी) या क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी मिळून विकसित केलेल्या पेमेंट यंत्रणेचा लाभ आयसीआयसीआय बॅंकेत चालू खाते (करंट अकाउंट) असणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. या ग्राहकांचे चालू खाते ‘मार्ग इआरपी सॉफ्टवेअर’शी जोडले जाऊन त्यातून ग्राहकांना अतिशय सुलभतेने डिजिटल व्यवहार करता येणार आहेत. मालाचा पुरवठा करणाऱ्यांना पेमेंट करणे, कर्मचाऱ्यांना पगार देणे, ही नेहमीची कामे यातून आरटीजीएस, एनइएफटी वा आयएमपीएस या माध्यमांद्वारे सहजपणे लहान कंपन्यांना करता येणार आहेत; तसेच बॅंकेच्या व इतर व्यवहारांच्या नोंदी ठेवणे, भांडवली कर्जासाठी अर्ज करणे, भविष्यात करावयाच्या पेमेंटची व्यवस्था करून ठेवणे अशी दैनंदिन आर्थिक कामे करण्यासाठी या सुविधेचा मोठाच उपयोग होणार आहे.

लघु उद्योगांना ही सुविधा अत्यंत सोयीची आहे. बॅंकेची वेबसाइट व ‘इआरपी’चे सॉफ्टवेअर यांच्यात आलटून-पालटून व्यवहार करण्याची गुंतागुंत त्यांना यातून टाळता येणार आहे; तसेच बॅंकिंग व अकाउंटिंग हे एकमेकांशी सुरळीतपणे व एकसंधपणे जोडले जाण्याने मोठ्या कंपन्यांना एकेकाळी मिळू शकणाऱ्या यंत्रणांचा लाभ हे लघु उद्योगही घेऊ शकतील.

या नव्या भागीदारीबद्दल बोलताना ‘आयसीआयसीआय बॅंके’चे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘डिजिटल स्वरूपाच्या नवकल्पना सादर करून ग्राहकांना जागतिक स्वरूपाच्या बॅंकिंगचा अनुभव देण्यात आयसीआयसीआय बॅंक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. ‘मार्ग इआरपी’च्या सहाय्याने एकात्मिक स्वरूपाची पेमेंट यंत्रणा सादर करून आम्ही एमएसएमइ ग्राहकांना व्यवसाय सुलभतेने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘कनेक्टेड बॅंकिंग’ ही यामागील संकल्पना पुढे नेण्याची आमची योजना आहे. डिजिटल व्यवहार, पेमेंट आणि अकाउंटिंगच्या नोंदी या सर्व गोष्टी एकत्रच, एकाच वेळी करता येणे ही या संकल्पनेची सुरुवात आहे. त्याचप्रमाणे पुरवठादारांचे (व्हेंडर) पेमेंट, कर्मचाऱ्यांचे वेतन या गोष्टीही डिजिटल पद्धतीने करणे, खेळत्या भांडवलासाठी अर्ज करणे, काही काळानंतर करायच्या पेमेंटची तरतूद करून ठेवणे, आदी गोष्टी अगदी सुलभतेने या ग्राहकांना करता येतील. यापुढील काळातही आम्ही ग्राहकांसाठी अशा नाविन्यपूर्ण सुविधा व सेवा सादर करत राहणार आहोत.’

‘मार्ग इआरपी’चे व्यवस्थापकीय संचालक सुधीर सिंग म्हणाले, ‘आयसीआयसीआय बॅंकेबरोबर झालेला हा आमचा पहिलाच संयुक्त करार आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी आम्ही एकत्रितपणे एक सॉफ्टवेअर विकसीत केले आहे. या कंपन्यांना दैनंदिन कामकाजात ज्या अडचणी येतात, त्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही येथे केला आहे. ‘मार्ग इआरपी सॉफ्टवेअ’रच्या माध्यमातून या कंपन्यांना आरटीजीएस, एनइएफटी व आयएमपीएस हे व्यवहार अतिशय सुलभतेने करता येणार आहेत. ‘मार्ग इआरपी सॉफ्टवेअर’मध्ये ग्राहकांनी केवळ आपल्या आयसीआयसीआय बॅंकेच्या चालू खात्याचा क्रमांक नोंदवायचा आहे. त्यासाठीदेखील त्यांना संगणकावर केवळ दोन ठिकाणी क्लिक करावे लागेल, इतकीच ही एकदा करायची प्रक्रिया आहे. लघु उद्योगांना याद्वारे ‘इंडिग्रेटेड बॅंकिंग’चे लाभ मिळतीलच, त्याशिवाय त्याचा वेळ वाचून त्यांची कार्यक्षमताही वाढेल. आम्ही ‘आयसीआयसीआय’शी ही भागीदारी करून अतिशय समाधानी आहोत.’

कोणतेही अतिरिक्त काम न करताही पैशाच्या व्यवहारांवर नियंत्रण, ऑटो बॅंक रिकन्सिलिएशन, पेमेंटचे बहुविध पर्याय, सुरक्षितता, मार्ग इआरपीद्वारे थेट पेमेंट, पेमेंटसाठी एकच डॅशबोर्ड, आयसीआयसीआय बॅंकेची इंटरनेट पद्धतीने धनादेश वितरीत करण्याची पद्धत मार्ग ‘इआरपी’च्या माध्यमातून, पेमेंटचे शेड्यूल, बॅंकेतील शिल्लक व स्टेटमेंटची उपलब्धता, ‘मार्ग इआरपी’मधून व्यावसायिक कर्जासाठी अर्ज करणे, किंमत व उपलब्धता हे ‘आयसीआयसीआय बॅंक-मार्ग इआरपी’ यांच्या भागीदारीचे लाभ आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link