Next
‘बीकेसी’मध्ये ‘९१स्प्रिंगबोर्ड’चे नवे दालन
प्रेस रिलीज
Wednesday, January 31 | 05:16 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्ठा व सर्वोत्तम सहकारी समूह ‘९१स्प्रिंगबोर्ड’ने भारतातील १५वे आणि मुंबईमधील चौथे दालन सुरू केले आहे. को-वर्किंग स्पेसची संकल्पना असलेले हे दालन मुंबई शहरामधील वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) आहे. ४०० पेक्षा अधिक आसनव्यवस्था असलेल्या या दालनामध्ये आधुनिक व्यवसाय गरजा, आकर्षक व समकालीन कार्यस्थळांपासून लाऊंज अशा सुविधा समाविष्ट आहेत.

गेल्या चार वर्षांपासून ‘९१स्प्रिंगबोर्ड’ने स्टायलिश, कार्यशील व उत्तम वातावरण असलेली कार्यस्थळे देण्यामध्ये भारताची आघाडीची कंपनी म्हणून आपली उपस्थिती निर्माण केली आहे. ‘९१स्प्रिंगबोर्ड’चे हे नवीन दालन १८ हजार चौरस फूट जागेवर पसरलेले आहे. या कार्यालयामध्ये भविष्याचा वेध घेणाऱ्या थीमनुसार डिझाइन केलेले इंटेरिअर्स, एैसपैस जागेमधील ऑफिस फर्निशिंग्ज, २४ तास हाय-स्पीड वायफाय इंटरनेट, कॉन्फरन्स व मीटिंग रूम्स, कॅफेज, लॉकर सुविधा, सर्वोत्तम खेळ क्षेत्र आणि विभिन्न नेटवर्किंग क्षेत्रासह इतर व्यापक ऑफरिंग्जचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ‘बीकेसी’तील हे कार्यालय सांताक्रूझ पूर्व व कलिनापासून नजिक आहे; तसेच मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्‍या सहा किलोमीटर अंतरावर आहे.

‘९१स्प्रिंगबोर्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद वेमुरी म्हणाले, ‘आम्हाला आमच्या चौथ्या दालनासह भारताच्या आर्थिक राजधानीमधील आमची उपस्थिती वाढवताना खूप आनंद होत आहे. मुंबई हे आमचे आवडीचे स्थळ राहिले आहे आणि आमच्या सहकारी कार्यालयांना या मोठ्या शहरामधील अनेक स्टार्टअप्स, फ्रीलांसर्स, एसएमई व मोठमोठ्या कंपन्‍यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही भारतभरात १५ कार्यालये स्थापित केली आहेत. ही प्रामुख्याने दिल्ली-एनसीआर, मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद व गोवा या शहरांमध्ये असून तीन अधिक कार्यालये आणि अशा अधिक कार्यालयांचे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळाचे वातावरण आणि व्यवसायासाठी विकासाचे पैलू यामध्ये परिपूर्ण संतुलन राखण्याच्या उद्देशाने आम्ही ‘स्प्रिंगबोर्ड’ म्हणून भारतातील उद्योजक संस्कृतीला समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link