Next
मार्कंडा, शोधग्राम, हेमलकसा
BOI
Wednesday, March 21 | 06:45 AM
15 1 0
Share this story

मार्कंडा
‘करू या देशाटन’च्या गेल्या भागात आपण खजुराहोला भेट दिली. खजुराहोचीच छोटी प्रतिकृती म्हणावी, असे ठिकाण महाराष्ट्रात विदर्भात आहे. त्याचे नाव मार्कंडा. सदराच्या आजच्या भागात सैर करू या मार्कंडा येथील मंदिरसमूह आणि आजूबाजूची ठिकाणे, तसेच आमटे कुटुंबीयांचे हेमलकसा आणि डॉ. बंग दाम्पत्याचे ‘शोधग्राम’ या ठिकाणी...
...........
वायुदेवतेचे शिल्पविदर्भातील मार्कंडा ही खजुराहोची छोटी प्रतिकृती म्हणावी लागेल. हिरव्या वनश्रीच्या कोंदणात वैनगंगा नदीच्या काठावर हा मंदिरसमूह आहे. तेथे मार्कंड ऋषींचे मंदिर आहे. त्यावरून या ठिकाणाला मार्कंडा हे नाव पडले. इ. स. १८७३मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांच्या नोंदीप्रमाणे येथे २४ मंदिरे होती. सन १९२४-२५च्या दरम्यान काही मंदिरे कोसळली. १७७७च्या सुमारास येथे वीज पडून देवळांचे बरेच नुकसान झाले, अशी नोंद भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात आहे. सध्या तेथे १८ मंदिरे अस्तित्वात आहेत. हे ठिकाण चंद्रपूर-मूल-चामोर्शी रस्त्यावर आहे.

पोपटाला चारा भरविणारी शुकसारिका सुरसुंदरीइ. स. ११००च्या सुमारास राष्ट्रकूट राजवटीत या मंदिरांची निर्मिती झाली असावी. मार्कंडा येथील मंदिरे ४० एकरावरील जागेत दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशा जागेवर उभारलेली आहेत. त्याच्या सभोवती नऊ फूट उंचीची भिंत आहे. येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची, तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात. प्रत्येक शिल्पात सौष्ठवाच्या, सौंदर्याच्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास करून ती घडविण्यात आली आहेत. नृत्यमुद्रा, त्यातील भाव अत्यंत सुंदर रीतीने घडविण्यात आले आहेत. एका युवतीचे शिल्प सुंदर असून, तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा, ती ‘आम्रपाली’चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. पोपटाला चारा भरविणारी शुकसारिका सुरसुंदरी, वसंत ऋतूचे आगमन सूचित करणारी मानिनी सुरसुंदरी.... वायु-शिवा - वायुदेवतेचे एक शिल्प, अंधकासुरवध शिवमूर्ती, अशी भरपूर शिल्पे आकर्षित करून घेतात.

मार्कंडेय ऋषींचे देऊळमार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिरही उत्कृष्ट शिल्पकलेने मढविलेले आहे. तसेच नंदी, मध्यभागी सरस्वती, चामुंडा व कंदुकक्रीडामग्न मुग्धा, चामरा, जया इत्यादी सुरसुंदऱ्या, भृशुंडी मुनी, मृत्युंजय, विठ्ठल-रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इत्यादी देवदेवतांची मंदिरे आहेत. म्हणूनच मार्कंडाला ‘विदर्भाची काशी’ असे म्हणतात. महाशिवरात्रीला येथे भाविकांची अलोट गर्दी होते.

डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंगशोधग्राम :
डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांनी इ. स. १९८८ साली त्यांनी ‘सर्च’ नावाची बिगरसरकारी संघटना गडचिरोलीतील ५८ गावांसाठी सुरू केली. सुमारे ४८ हजार लोकांसाठी काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून झालेल्या या संस्थेचे मुख्यालय शोधग्राम या नावाने ओळखले जाते. त्यांनी आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान प्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प ‘सर्च’मध्ये सुरुवातीपासून राबवण्यात येत आहे. डॉ. अभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य ‘सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’ (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. न्यूमोनिया हे बालमृत्यूचे सर्वांत मोठे कारण आहे, हे ‘सर्च’ने दाखवून दिले.

हेमलकसाहेमलकसा :
दिवंगत बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी पत्नी डॉ. मंदाकिनी यांच्यासह हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प उभा केला. त्या माध्यमातून ते सेवाव्रत म्हणून आदिवासी लोकांना वैद्यकीय सेवा पुरवतात. २३ डिसेंबर १९७३पासून आमटे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवते. जखमी वन्यप्राण्यांवरही ते उपचार करतात. डॉ. प्रकाश आमटे यांनी ‘प्रकाशवाटा’ नावाचे पुस्तक लिहिले असून, त्यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित ‘डॉ. प्रकाश आमटे : दी रिअल हीरो’ या नावाचा चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झाला. त्यांच्या जीवनावर ‘हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आहे.

डॉ. प्रकाश आमटे
डॉ. आमटे आणि डॉ. बंग या दोन्ही दाम्पत्यांनी आपल्या समाजसेवेच्या कर्तृत्वाने या गावांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचवली आहे. त्यामुळे ही ठिकाणे तीर्थक्षेत्रे म्हणून लोकांनी भेट द्यावीत, अशीच आहेत.

मार्कंडाच्या आसपास :
वैरागड हा गोंड राजा विराट याने बांधलेला किल्ला असून, तेथे भंडारेश्वराचे हेमाडपंती देऊळही आहे. इसवी सनाच्या १५व्या शतकात येथे हिऱ्याची खाण सुरू होती. हिऱ्याच्या खाणीस संस्कृतमध्ये ‘वैरागर’, ‘वज्राकर’ अशी नावे आहेत. त्यावरूनच या स्थळाला ‘वैरागर’ हे नाव पडले असावे व वैरागड हे काळाच्या ओघात झालेले वैरागरचे अपभ्रष्ट रूप असावे, असाही तर्क आहे.

वैरागडवैरागड किल्ल्याच्या सभोवताली खोल खंदक असून, बुरुजांची उंची १० ते २० फूट आहे. प्रवेशद्वार दक्षिणेस आहे. या किल्ल्यात प्रवेश करताना तीन दरवाजांतून जावे लागते. किल्ल्याच्या आत एक विहीर असून, ती सध्या बुजलेल्या अवस्थेत आहे. या विहिरीतून एक गुप्त मार्ग असल्याचे निदर्शनास येते. हा किल्ला चंद्रपूरपासून १२१ किलोमीटर अंतरावर आहे.

भामरागड येथेही अभयारण्य असून, ते चंद्रपूरपासून ८५ किलोमीटर अंतरावर आहे. चपराळा अभयारण्य चंद्रपूरपासून ८६ किलोमीटर अंतरावर असून, त्याचे क्षेत्रफळ १३४ चौरस किलोमीटर आहे. गडचिरोली हा संपूर्ण जिल्हाच वनश्रीने नटलेला असून, हे मुख्यत्वे काळविटांचे आश्रयस्थान आहे. गोंड आदिवासींचे वास्तव्य असलेला हा जिल्हा मागास भागात असून, पूर्वेकडील छत्तीसगडला लागून असलेला भाग सध्या नक्षलवाद्यांच्या कारवायांनी ग्रस्त आहे.

अल्लापल्लीप्राणहिता व गोदावरीचा संगमही पाहण्यासारखा असून, तो चंद्रपूरपासून ११५ किलोमीटरवर आहे. आरमोरी येथे प्राणहिता व वैनगंगा या नद्यांचा संगम आहे. अल्लापल्ली येथे वन विभागाचा सागवान डेपो असून, तेथे जातिवंत सागवानांची शास्त्रशुद्ध पद्धतीने जोपासना केली जाते. हेही नक्षलवाद्यांचे प्रभावक्षेत्र आहे
आमगाव महाल येथे काही पुरातन शिल्पे सापडली असून, हे ठिकाण चंद्रपूरपासून २४६ किलोमीटर अंतरावर आहे. सिरोंचा येथेही अभयारण्य असून, कालेश्वर मंदिरही आहे. गडचिरोली जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्याची विभागणी करून निर्माण करण्यात आला आहे.

कसे जायचे?
पुणे, मुंबईहून सेवाग्राममार्गे रेल्वेने चंद्रपूर येथे उतरून तेथून बसने किंवा टॅक्सीने मार्कंडा येथे जाता येते. हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यात असून, चंद्रपूरपासून ६६ किलोमीटर अंतरावर आहे. चंद्रपूरमध्ये राहण्याची चांगली व्यवस्था आहे. चंद्रपूर हे ग्रँट ट्रंक मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून, नागपूर, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादला जोडलेले आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची कोरलेली चित्रे
(मार्कंडा, शोधग्राम, हेमलकसा या भागांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pravin Kalal About 135 Days ago
सुंदर आणि उपयुक्त माहिती
0
0
Shripad phatak About 249 Days ago
Best info,a small shiva temple at parali sajjangadache paythyashi,aahe ashich chan shilpe tethehi ahet.
0
0
Ramesh Atre About 256 Days ago
माहितीपूर्ण लेख!
0
0
Vishakha Abhyankar About 262 Days ago
मार्कंड मंदिर ऐकलं नव्हतं. छान माहिती. फोटोजही मस्त...
1
0
Raju sonar About 262 Days ago
सुंदर माहीती आहे पुढील पर्यटन ठिकाण माहिती प्रसिद्ध होण्याची आम्ही वाट पाहत आहोत
1
0
Satish dhande About 263 Days ago
Khup chhan mahiti!
1
0
Kamat About 263 Days ago
Atishay upyogi mahiti, dekhna video. jayla milal tar nakkich aavdel
1
0
Hemant Wattamwar About 263 Days ago
खूप मोठी माणसं त्यांच्याबद्दल अभिप्राय देण्यासाठी पात्रता हवी...🙏 आपण इतकी छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
1
0
Sudhir About 263 Days ago
दोन महिन्यांपूर्वी या सर्व ठिकाणी जाऊन आलो. प्रकाशजींच्या बरोबर समोरासमोर संवाद साधला. बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तसेच मार्कंडा येथील मंदिर सुद्धा नवीन आकार घेत आहे. एक त्रिवेणी संगम!
1
0
Sanjay Kulkarni About 263 Days ago
खुप छान माहिती !!
1
1
Madhura Khadilkar About 263 Days ago
खूप छान महिति आसते ,आसेच लिहित रहा काका,आनेकाना बारिचठिकाने महित नसतात पान तुमचया ब्लॉगमले कलते. खूप आभार
1
0
राजेन्द्र ढमढेरे About 263 Days ago
खुप सुंदर माहिती
1
0
Anand Mayekar About 263 Days ago
Madhavji tumche abhar manave tevdhe thodech.Dar Budhavari hi deshatanachi mahatvapurna mahiti devun amchya dnyanat bhar padate. Dhanyawad
1
0
जयश्री चारेकर About 263 Days ago
फारच छान माहिती आहे.लेणीविषयी माहिती नव्हते. अप्रतिम
1
0
Dattatray phadke About 263 Days ago
फार छान माहिती दिलीत. डॉ. बंग दाम्पत्य आणि डॉ. आमटे दाम्पत्य ह्यांनी केलेल्या कार्याची माहिती समग्र मिळाली माधवराव आभारी आहे
1
0
Milind Lad About 263 Days ago
Very much beautiful information. Earlier not know about place "Markanda". Thanks. Your articles are always elaborative, vivid description of places around. Thanks for nice efforts...
1
0
Vasant Landge About 263 Days ago
Very good information.India is rich in heritage. Temples and sculptures seem to be in protected conditions.Would like to visit these places,both modern as well as historically important ones.
1
0
Suresh Kulkarni About 263 Days ago
खजुराहोची आठवण करून देणारा बहुमोल वारसा.असे सुंदर प्राचीन स्थळ महाराष्ट्रात आहे याचीकल्पनाही नव्हती. मनःपूर्वक धन्यवाद शेअर केल्याबद्दल!
1
0
Manohar Tayde About 263 Days ago
Very nice,I have seen Markanda &Hemalkasa
1
0
Shashikant Pimplaskar About 263 Days ago
Very nice information. Didn't know that.
1
0
Parashuram Babar About 263 Days ago
Aprtim
1
0

Select Language
Share Link