Next
नव्या रूपातील प्रगती एक्स्प्रेस प्रवाशांच्या भेटीला
खासदार अनिल शिरोळे यांनी दाखवला हिरवा कंदील
प्रेस रिलीज
Monday, November 05, 2018 | 04:46 PM
15 0 0
Share this storyपुणे : मुंबई-पुणेदरम्यान दररोज प्रवास करणारी प्रगती एक्स्प्रेस आता नव्या रूपात प्रवाशांच्या भेटीला आली आहे. चार नोव्हेंबर २०१८ रोजी पुणे स्थानकात या गाडीला खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवून नव्या रूपातील पहिल्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ‘उत्कृष्ट’ या प्रकल्पाअंतर्गत प्रगती एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांमध्ये नाविन्यपूर्ण बदल करीत नव्या रूपात तिचे सादरीकरण केले आहे. या बदलानंतर प्रगती एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या वेळी पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, स्टेशन डायरेक्टर ए. के. पाठक, वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना खासदार शिरोळे म्हणाले, ‘मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. या प्रवाशांची सोय पाहत रेल्वे विभागाने आवश्यक त्या सोयी देण्याबरोबरच एक आरामदायी प्रवास प्रवाशांना मिळावा यासाठी ‘उत्कर्ष’ या उपक्रमांतर्गत प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. रेल्वे ही भारताची ‘लाइफ लाइन’ आहे. स्वस्त आणि सुरक्षित अशी ही व्यवस्था आहे. त्यामुळे ही व्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी असावी, असा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. या उपक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या सोयी या उल्लेखनीय असून, प्रवाशांच्या देखील त्या पसंतीस पडत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.’या प्रकल्पाअंतर्गत प्रगती एक्स्प्रेसच्या डब्यांच्या आत आणि बाहेर आकर्षक रंगसंगती वापरत सजावट करण्यात आली आहे. यावर अँटी ग्राफीटी कोटिंग असून, यामुळे त्याचे धुळीपासून संरक्षण होते. डब्यातील मोकळ्या जागेत रेड कार्पेट टाकण्यात आले आहे. महाराष्ट्राची संस्कृती व पर्यटन स्थळांची माहिती देणारी अनेक आकर्षक चित्रे एक्स्प्रेसवर काढण्यात आली आहेत. त्याचबरोबर अंध प्रवाशांच्या सोईसाठी ब्रेल लिपीतील बैठक क्रमांक, मोबाइल चार्जिंग सुविधा, आकर्षक पडदे, एलईडी लायटिंग, डिजिटल घड्याळ, डिजिटल माहिती फलक, सामान ठेवण्यासाठी स्टीलचे रॅक यांचीही सोय करण्यात आली आहे. प्रत्येक डब्यातील स्वच्छता गृहाच्या रचनेतही बदल करीत पाणी बचतीसाठी आधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link