Next
बेंगळुरूमध्ये मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर
प्रेस रिलीज
Wednesday, September 12 | 02:20 PM
15 0 0
Share this storyबेंगळुरू : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने बेंगळुरू या भारतातील टेक कॅपिटलमध्ये जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर सुरू केल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर जेथे असणार आहे त्या ब्रिगेड रोडवरील वौशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसचे नूतनीकरण करण्यात आले आहे व आर्किटेक्चरचा एक भव्य नमुना म्हणून जतन करण्यात आले आहे. सॅमसंग ऑपेरा हाउस लोकांना विशेष अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान, जीवनशैली व नाविन्य एकत्र आणणार आहे.

देशातील पहिल्यावहिल्या सॅमसंग ऑपेरा हाउसमध्ये, ‘सॅमसंग’च्या #DiscoverTomorrowToday या विचारसरणीवर आधारित असलेल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांचे दर्शन घडवले जाईल. उत्पादनांचे हे अनुभव सॅमसंग जगभर प्रवर्तक असलेल्या व्हर्च्युअल रिअलिटी (व्हीआर), आर्टिफिशिअल इंटलिजन्स (एआय) व इंटनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) या परिवर्तनशील तंत्रज्ञानांवर आधारित असतील.  

तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले विविध अनुभव व मनोरंजन यांचा आनंद घेण्यासाठी इच्छुक असलेल्या शहरातील तरुणांसाठी सॅमसंग ऑपेरा हाउस हे हक्काचे ठिकाण असणार आहे. तेथे ३६० डिग्री त्रीमितीय हालचाली करणारे फोर-डी चेअर किंवा व्हिपलॅश पल्सर फोर-डी चेअर असे व्हीआर अनुभव घेता येतील. एखाद्याला फायटर पायलटच्या भूमिकेमध्ये जाऊन एअरक्राफ्ट स्टंट करता येऊ शकतात किंवा स्पेस बॅटल किंवा रोलर कोस्टर राइड अनुभवता येऊ शकते.

केकेइंग किंवा रोइंगचा थरार आवडणाऱ्यांसाठी व्हीआर अनुभव वाट बघत आहे. फिटनेसप्रेमींना मित्राबरोबर शर्यत लावत, अप्रतिम युरोपमध्ये सायकल चालवण्याचा आनंद घेता येऊ शकतो. कुटुंबीयांबरोबर सिनेमा व शो पाहण्यासाठी ग्राहकांना सेंटरचे होम थिएटर अगोदर बुक करता येऊ शकते.

बेंगळुरूतील नाविन्य, जीवनशैली, मनोरंजन व संस्कृती यांचे केंद्र बनण्याचे सॅमसंग ऑपेरा हाउसचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्लाझा क्षेत्रामध्ये वर्षभर फिटनेस, फोटोग्राफी, गेमिंग, संगीत, सिनेमा, फूड, स्टँड-अप कॉमेडी, तंत्रज्ञान व स्टार्ट-अप यासंबंधीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

‘सॅमसंग’ने शहरात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळले की, भारतातील काम किंवा लिजर जीवन यामध्ये परिवर्तन आणेल अशी किमान एक तरी कल्पना आपल्याकडे असल्याचे बंगळूरूतील बहुसंख्य रहिवाशांनी (८१ टक्के) सांगितले; परंतु, समविचारी व्यक्ती व मार्गदर्शक यांच्याशी संपर्क निर्माण करता येईल व आपल्या कल्पना जोपासता येतील, असे शहरातील एकही ठिकाण माहिती नसल्याचे तीनपैकी एकाने नमूद केले.

‘आजच्या ग्राहकांना, विशेषतः तरुणांना, खास अनुभव अपेक्षित सतात. त्यांना ब्रँडशी संवाद साधायचा असतो, स्पर्श, अनुभव हवा असतो व ब्रँड निर्माण करायचा असतो. सॅमसंग ऑपेरा हाउसमध्ये हेच साकारले आहे. सर्व वयोगटांना आवडेल, असा अपूर्व अनुभव आम्ही देणार आहोत. ऑपेरा हाउस सॅमसंगचे नाविन्य व लोकांची पॅशन यांची सांगड घालत कार्यशाळा, उपक्रम व कार्यक्रम यांचे आयोजन करणार आहे. या जागेने आजवर पाहिलेले परिवर्तन अभिमानास्पद असे आहे,’ असे सॅमसंग साउथवेस्ट आशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. होंग यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link