Next
मुंबईत महिला उमेदवाराचा पैसेवाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल!
BOI
Wednesday, February 08, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

समाजवादी पक्षाच्या (सपा) महिला उमेदवाराने मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील मतदारांना पैसेवाटप केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आएशा शेख या गोवंडी येथील वॉर्ड क्रमांक १४० मधून सपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मतदारांना पैसेवाटप केल्याचा एक व्हिडिओ काल उजेडात आला. या व्हिडिओत आएशा शेख काही लोकांसोबत मराठीत बोलताना दिसत आहेत. मला मतदान करा. आपण गाववाले आहोत, तुम्ही माझ्या माहेरची लोकं, मी तुमच्या देवासाठी माझ्यातर्फे थोडं करून देते… १५ हजार रूपये गुड लक म्हणून ठेवा. माझ्यासाठी प्रार्थना करा आणि तुमच्या शब्दाला कायम राहा, मला सगळी मते द्या, असे आवाहन त्या लोकांना करताना दिसत आहेत. याशिवाय, व्हिडिओत त्यांनी १५ हजार रूपयांचे बंडल काढून एका व्यक्तीच्या हातामध्ये दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search