Next
साईबाबा संस्‍थानकडून केरळ पूरग्रस्तांसाठी पाच कोटी
प्रेस रिलीज
Saturday, September 29 | 03:33 PM
15 0 0
Share this story

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था यांच्यातर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश मुख्‍यमंत्री दे‍वेंद्र फडणवीस यांच्‍याकडे सुपूर्द करताना संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि मान्यवर.

शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था यांच्या वतीने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे व राज्‍याचे जलसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राज्‍याचे मुख्‍यमंत्री दे‍वेंद्र फडणवीस यांच्‍याकडे सुपूर्द केला.

या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री मदन येरावार, राज्‍याचे मुख्‍य सचिव डी. के. जैन, मुख्‍यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भुषण गगरानी, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

केरळ राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर  परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे तेथील जनजीवन विस्‍कळीत झाले होऊन परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. या पुरामुळे लाखो नागरिक बेघर झाले आहेत; तसेच अनेक गांवेही उध्‍वस्‍त झाली आहेत. या भीषण नैसर्गिक आपत्‍तीला सामोरे जाताना आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजून व माणुसकीच्‍या संवेदनांना साद देऊन केरळमधील आपत्‍तीग्रस्‍तांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या व्‍यवस्‍थापन समितीने घेतला होता. त्‍यानुसार केरळ पूरग्रस्‍तांसाठी संस्‍थानतर्फे पाच कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link