Next
प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या
BOI
Monday, December 18, 2017 | 04:27 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : कोकणातील निसर्गरम्य रत्नागिरी शहर प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याचे आवाहन रत्नागिरी नगरपालिकेने केले आहे. त्याला प्रतिसाद देऊन शहरातील ‘दी गिफ्ट ट्री’ ही संस्था पुढे आली असून, पुण्यातील हरित मित्र परिवाराच्या सहकार्याने ही संस्था ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या’ हा उपक्रम लवकरच सुरू करत आहे. BytesofIndia.com हे पॉझिटिव्ह मीडिया पोर्टल या उपक्रमाचे ‘ऑनलाइन मीडिया पार्टनर’ आहे.

रत्नागिरीतील सिद्धेश धुळप हा तरुण सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. ‘दी गिफ्ट ट्री’ ही त्याने सुरू केलेली पर्यावरणविषयक संस्था असून, त्याद्वारे लागवडीसाठी रोपांचे वाटप केले जाते. ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या द्या’ या नव्या उपक्रमाबद्दल सिद्धेश म्हणाला, ‘शहरातील नागरिकांनी घरातील कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त दहा प्लास्टिक पिशव्या, तसेच दूध, तेल, पाणी अथवा शीतपेयांच्या बाटल्या आमच्याकडे आणून द्याव्यात. हे दिल्यानंतर त्या बदल्यात एक कापडी पिशवी मोफत देण्यात येणार आहे. नागरिकांकडून घेतलेल्या या पिशव्यांचा वापर पुढील पावसाळ्यात रोपे लावण्यासाठी केला जाणार आहे.’

‘पहिल्या टप्प्यात एक हजार कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत. टेलर्सकडे कपडे शिवल्यानंतर कापडाचे अनेक छोटे तुकडे उरलेले असतात. रत्नागिरीतील सर्व टेलर्सकडून हे तुकडे गोळा करण्यासंदर्भात सध्या विचारविनिमय सुरू आहे. शिवणकाम करत असलेल्या बचत गटांना कापडाचे हे तुकडे देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या बनवून घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत,’ असेही सिद्धेशने सांगितले.

प्लास्टिक हा विघटन न होणारा कचरा असून, त्याचे दुष्परिणाम मोठे आहेत. तसेच प्लास्टिक पिशवीत अन्न बांधून कचऱ्यात फेकण्याचे प्रकार मुक्या जनावरांच्या जिवावर बेतत आहेत. शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने प्लास्टिकचा कचरा विखुरलेला असतो. यामुळे शहराच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. या पार्श्वभूमीवर, या नव्या संकल्पनेमुळे रत्नागिरीच्या स्वच्छतेत आणि सुंदरतेत भर पडेल, असा विश्वास आयोजकांना वाटतो. या उपक्रमात शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे आणि दैनंदिन जीवनात प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर सुरू करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

BytesofIndia.com हे ‘पॉझिटिव्ह मीडिया पोर्टल’ समाजातील सकारात्मक घडामोडी, चांगले उपक्रम यांना प्रसिद्धी देते. म्हणूनच हे पोर्टल रत्नागिरीतील या उपक्रमाचे ‘ऑनलाइन मीडिया पार्टनर’ बनले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

सिद्धेश धुळप : ९९७०३ ४८१९७
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search