Next
‘भिडे वाड्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करा’
प्रेस रिलीज
Friday, December 08, 2017 | 02:50 PM
15 0 0
Share this article:

भिडे वाडापुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी येथील भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यामुळे भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन होण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात विशेष बैठक घेतली. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशा सूचना त्यांनी विधी व न्यायविभाग व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

या वेळी विधी व न्याय विभागाचे उपसचिव श्री. पाटील, नगरविकास विभागाचे संजय गोखले, महसूल व वनविभागाचे सहसचिव श्री. गावडे, महापालिका उपायुक्त सतीश कुलकर्णी, स्मारक समितीतर्फे नगरसेवक महेश लडकत यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
२०११ मध्ये तत्कालीन सरकारी वकिलांनी भूमिसंपादन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा ताबा देण्याची प्रक्रिया रखडली असल्याचे बापट यांना झालेल्या या चर्चेतून निर्देशनास आले. त्यामुळे या प्रकारातून तातडीने मार्ग काढाण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी विधी व न्याय खात्याला दिली. संबंधित पत्रावर विधी व न्याय खात्याचे मत लवकरात लवकर कळवावे, अशी सूचना ही बापट यांनी यावेळी केली.

‘भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक आहे. हा विषय सर्वांसाठी  महत्त्वाचा आहे. या आधी या संदर्भात काय काय कामे झाली याची माहिती एकत्र करून मला द्यावी; तसेच या विषयाची कायदेशीर प्रक्रिया आणि त्या अनुषंगाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया यापुढील काळात कमीत कमी वेळेत होईल याबाबत नियोजन करा,’ असे आदेश बापट यांनी दिले.

या वेळी भिडेवाड्यासंदर्भात २०११ नंतरच्या काळात झालेली दिरंगाई समजून घेऊन त्याबाबत बापट यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अशी दिरंगाई यापुळे खपवून घेणार नसल्याचे बापट यांनी या वेळी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search