Next
हिमायतनगरच्या राजा भगीरथ शाळेत ‘आनंद मेळावा’
नागेश शिंदे
Thursday, January 24, 2019 | 11:27 AM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर : येथील राजा भगीरथ माध्यमिक शाळेत २२ जानेवारी २०१९ रोजी सकाळी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती माया राठोड व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार यांनी केले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष कुणाल राठोड, नगरसेवक विनायक मेंडके, सावन डाके, दिलीप राठोड, बंडू अंनगुलवार, पत्रकार अनिल मादसवार, जांबुवंत मिराशे, नागेश शिंदे उपस्थित होते.



या मेळाव्याचे औचित्य साधून गेल्या दोन दिवसांपासून शाळेतील मुलांनी इडली चटणी, पाव वडा, साबुदाण्याचा वडा, कचोरी, पोहे, शिरा, ढोकळा, गुलाबजाम, मटकी उसळ यांसारखे विविध पदार्थ बनवून ते विक्रीसाठी ठेवले होते. नफा-तोटा यांचे गणित कसे असते याचा लहान मुलांनी ज्ञानरचनावादी संकल्पनेतून अभ्यास केला



या प्रसंगी नगराध्यक्ष राठोड यांनी लहान मुलांनी थाटलेल्या दुकानांना भेट दिली आणि मुलांनी तयार केलेले पदार्थ विकत घेऊन त्यांचा आस्वाद घेतला. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक अंनगुलवार, श्री. सागर, श्री. मुठेवाड, श्री. पवार, श्री. सोमवंशी, श्री. वानखेडे, श्री. कापसे, श्री. दिक्कतवार, श्री. बेरदेवाड, श्री. आठवले, श्री. आल्लेवाड, श्री. चौधरी, श्री. जाधव, श्री. माने, श्री. बाचावार, श्री. उत्तरवार, श्री. सूर्यवंशी, श्रीमती उत्तरवार, श्रीमती रेडी यांसह सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेत मुलांचा उत्साह द्विगुणित केला.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search