Next
सोनाली बेंद्रे नव्या जोमाने पुन्हा कामावर..
कर्करोगाच्या यशस्वी लढाईनंतर अद्भुत वाटत असल्याची भावना
BOI
Monday, February 04, 2019 | 02:29 PM
15 0 0
Share this article:

सोनाली बेंद्रेमुंबई : मागील सहा-सात महिने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करत आयुष्याची नवी इनिंग सुरू केलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता बरी होऊन मुंबईत परतली असून, तिने पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. पुन्हा काम सुरू केल्याची भावना खूप अद्भुत असल्याचे सांगत इन्स्टाग्रामवर या संदर्भात तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. 

तेच डोळे, तेच गोड हसू... फक्त डोक्यावर केस नाहीत. परंतु पूर्वीपेक्षाही जास्त आत्मविश्वास सोबत घेऊन हात जोडून चाहत्यांना धन्यवाद देणारी सोनाली बेंद्रे प्रसन्न मुद्रेत नुकतीच मुंबई विमानतळावर चाहत्यांनी अनुभवली. सोबत तिचे पती गोल्डी बहल होते. आपल्याला कॅन्सर झाला असून त्याच्या उपचारासाठी आपण न्यूयॉर्कमध्ये असल्याची धक्कादायक बातमी जुलै २०१८ला सोनालीने स्वतः दिली होती. यावर संपूर्ण बॉलीवूड हळहळले होते. सर्वजण तिच्या परतण्याची प्रार्थना करत होते. तिच्या उपचारादरम्यान कित्येक कलाकारांनी तिची भेट घेऊन तिचा आत्मविश्वास वाढवला होता. 

आपल्या आजारादरम्यानही सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असलेली सोनाली वेळोवेळी आपल्या तब्येतीबद्दल आणि त्यासाठीच्या आपल्या लढाईबद्दल चाहत्यांना अपडेट देत राहिली. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करतानाही तिचा आत्मविश्वास थोडाही कमी झालेला दिसला नाही. आपण लवकर यातून बरे होऊन पुन्हा भारतात परत येऊ, हा आत्मविश्वास तिला कायम होता. त्यानुसार डिसेंबर महिन्यात सोनाली बरी होऊन भारतात परतली आणि तिच्या चाहत्यांनी एक नवीन सोनाली पाहिली. 

सोनाली बेंद्रे आणि प्रियांका चोप्रा‘लोक म्हणतात दूर असण्याने मनांमधील अंतर आणखी मजबूत होतं, मात्र दूर असणं ही एक खूप मोठी शिकवण असू शकते हे मी अनुभवलं आहे. उपचारादरम्यान देशापासून, घरापासून, माझ्या माणसांपासून दूर असताना मी प्रत्येक दिवशी एका नवीन कथेचा भाग होते, जिथे प्रत्येकजण संघर्ष करत जगत होता. परंतु मैदान सोडून पळून जाण्याची कोणाचीही तयारी नव्हती. हाच अनुभव मला खूप मोठी गोष्ट देऊन गेला, आत्मविश्वास आणि याच आत्मविश्वासाच्या बळावर मी ही लढाई जिंकली आहे. आज मी त्या मार्गावर आली आहे, जिथे माझं मन आहे. परत आल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करत आहे. शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशा भावना आहेत’, अशा शब्दांत सोनालीने तिच्या पुन्हा सक्रिय होण्याबद्दलची पोस्ट केली आहे. 

मॉडेलिंगने आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतर १९९४मध्ये सोनालीने ‘आग’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आणि तिच्या पुढील प्रवासाचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. मोठ्या लढाईनंतर आता पुन्हा सोनाली कॅमेरासमोर येत आहे. नव्या रुपातील सोनाली कशी असेल, याची उत्सुकता बॉलीवूडलाच नव्हे, तर सर्वांनाच आहे..  


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search