Next
‘सुशिं’च्या विलोभनीय ‘रूपमती’चे आता श्रवणीय गारुड
ऑडिओबुकचे मंगळवारी रसिकार्पण
BOI
Saturday, June 01, 2019 | 04:04 PM
15 0 0
Share this article:

पुणे : वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ३५ वर्षांपूर्वी साकारलेल्या ‘रूपमती’ या कादंबरीची श्राव्य आवृत्ती स्टोरीटेल या आघाडीच्या ऑडिओबुक सेवेमध्ये दाखल होत आहे. ३५ वर्षांपूर्वी आलेल्या या अजरामर साहित्यकृतीच्या श्राव्य आवृत्तीचे रसिकार्पण ‘स्टोरीटेल हॅपी लिसनिंग’ या उपक्रमांर्गत मंगळवारी, चार जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. 

प्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी यांच्या आवाजात साकारलेल्या या कलाकृतीची झलक त्यांच्याच आवाज ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व मोफत आहे.  

नवी पेठ येथील पत्रकार भवनातील सभागृहामध्ये मंगळवारी, दुपारी तीन वाजता आयोजित या कार्यक्रमात ‘सुशि वाचक परिवारा’चा विशेष सहभाग असणार आहे. स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख व्यवस्थापक योगेश दशरथ, सुगंधा सुहास शिरवळकर यांचीही या वेळी प्रमुख उपस्थिती असेल. 

‘रूपमती’ ही ऐतिहासिक कादंबरी सुहास शिरवळकरांच्या साहित्यसंपदेतील एक मानाचे पान आहे. ती ऐकणे हा देखील साहित्यरसिकांसाठी एक विलक्षण अनुभव ठरावा, या उद्देशाने ‘स्टोरीटेल’ ने प्रसिद्ध कलाकार तुषार दळवींच्या आवाजात ती रसिकांपुढे आणली आहे. यानिमित्ताने सुशिंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांचे हे अजरामर कार्य रसिकांपुढे श्राव्य माध्यमातून आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी रसिकांना ‘रुपमती’मधील निवडक प्रसंगाचे अभिवाचन प्रत्यक्ष तुषार दळवींकडून ऐकण्याची तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. याचा रसिकांनी जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन ‘स्टोरीटेल’ व ‘सुशि वाचक परिवारा’च्या वतीने करण्यात आले आहे. 

सुहास शिरवळकर
तरुणाईशी जुळणारा एक अदृश्य धागा सुहास शिरवळकरांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तरुणाईच्या हृदयावर वर्षोंनुवर्षें राज्य करणाऱ्या ‘दुनियादारी’ लिहिणाऱ्या सु.शिं.ची एक नाजूक, हृदयस्पर्शी, भावपूर्ण अशी ऐतिहासिक कादंबरी म्हणजे ‘रूपमती’. 

‘बाजबहाद्दर-रूपमती’ची या प्रेमकहाणीच्या प्रकाशनास यंदा ३५ वर्षें पूर्ण होत आहेत. इतक्या कालावधीनंतरही तितकीच दिलखेचक आणि टवटवीत असलेली ही कादंबरी आता ‘स्टोरीटेल’ने ‘ऑडिओबुक’च्या स्वरुपात जगभरातील रसिकांसाठी सादर केली आहे. अत्यंत परिश्रम घेऊन, प्रत्यक्ष संशोधन करून शिरवळकरांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. एकाहून एक सुरेख अशी शेरोशायरी अन् साहित्यसौंदर्याचे दर्शन घडवणाऱ्या शिरवळकरांच्या आगळ्या शैलीची साक्ष देणारी ‘रूपमती’ श्राव्यरुपातून रसिकांच्या आणखीच जवळ येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search