Next
रत्नागिरी लायनेस क्लब विविध पुरस्कारांनी सन्मानित
BOI
Friday, June 28, 2019 | 01:25 PM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : लायनेस क्लब ऑफ रत्नागिरीने २०१८-१९ या वर्षासाठी विविध समाजोपयोगी कार्य करून प्रांतात आपले नाव उंचावले असून, कोल्हापूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या प्रांताच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात लायनेस क्लब ऑफ रत्नागिरीने विविध पुरस्कार पटकावले आहेत.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात रत्नागिरी लायनेस क्लबच्या अध्यक्ष लायनेस सईदा बाग यांनी ‘एक्सलंट प्रेसिडेंट’, सचिव रजिया बाग यांनी ‘एक्सलंट सेक्रेटरी’, खजिनदार शकुंतला झोरे यांनी ‘आउटस्टँडिंग ट्रेझरर’ हे पुरस्कार मिळविले. त्याच प्रमाणे ‘आउटस्टँडिंग क्लब’, ‘एक्सलंट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट व्हिजीट’, ‘एक्सलंट इव्हेंट महिला मेळावा’, ‘एक्सलंट रेकॉर्ड’, ‘ॲप्रिसिएशन अॅवॉर्ड फॉर डिस्ट्रिक प्रोग्राम- इंहन्सिंग लायनेस इमेज’, ‘अॅप्रिसिएशन वर्ड फॉर रिच आउट ऑफ न्यू मार्केट’ असे वेगवेगळे पुरस्कार स्वत:च्या नावावर करून लायनेस क्लब रत्नागिरीचे नाव प्रांतातच नव्हे, तर जनमानसात उंचावले. 

बेस्ट रिजन कॉर्डिनेटर पुरस्कार स्वीकारताना लायनेस रिजन कॉर्डिनेटर प्राची शिंदे

लायनेस प्रेसिडेंट सईदा बाग व त्यांच्या सहकाऱ्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. त्याचबरोबर या सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या व त्यांच्या पाठीशी असणाऱ्या लायनेस रिजन कॉर्डिनेटर प्राची शिंदे यांनाही बेस्ट रिजन कॉर्डिनेटर या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. लायनेस क्लब ऑफ रत्नागिरीच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search