Next
संस्कृत-मराठी-इंग्लिश शब्दकोश
BOI
Wednesday, June 13 | 10:12 AM
15 0 0
Share this story

संस्कृत शब्दांचे अर्थ मराठीत व इंग्रजीत एकत्र देणारा हा पहिलाच शब्दकोश आहे. यामध्ये शब्दाच्या अर्थाशिवाय व्याकरणाच्या दृष्टीने त्याची नामलिंग, सर्वनाम, विशेषण, अव्यय, गण, धातू यांची माहितीही कंसात दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोहोंसाठी तो उपयुक्त ठरावा.

नामाचे प्रथम, एकवचन आणि धातूचे वर्तमानकाळी तृतीयपुरुष, एकवचनही उद्धृत करण्यात आले आहे. एकच नाम अनेकलिंगी असू शकते, तशी सर्व रूपे दिलेली आहेत आणि एकच धातू अनेक गणांमध्ये चालू शकतो, त्याची रूपेही दिलेली आहेत.

संस्कृतमध्ये धातूला उपसर्ग लागला म्हणजे त्याचे पद व अर्थ बऱ्याचदा बदलतात, त्याची माहिती ही या कोशात दिली आहे. कोशात शब्दार्थ देताना प्रथम संस्कृत शब्द, या शब्दाला मराठी प्रतिशब्द आणि त्यानंतर इंग्रजी प्रतिशब्द अशा क्रमाने देण्यात आले आहेत.  

प्रकाशक : अनमोल प्रकाशन
पाने : ३०९
किंमत : ७५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link